Join us

मुलांकडून ५ गोष्टी नेमाने करून घ्या; मेंदू होईल तल्लख, एकाग्रता वाढून अभ्यासात होतील हुशार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2025 14:34 IST

1 / 7
मुलांनी अभ्यासात हुशार असावं, परीक्षेत चांगले यश मिळवावे यासाठी त्यांची एकाग्रता चांगली असणे गरजेचे असते. काही मुलं हुशार असतात. पण त्यांची एकाग्रताच नसते. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळत नाही.
2 / 7
म्हणूनच लहानपणापासूनच मुलांना अशा काही गोष्टींचं वळण लावा ज्यामुळे त्यांचा मेंदू तर तल्लख होईलच पण एकाग्रताही वाढेल. या दोन गोष्टी साध्य झाल्या की मग आपोआपच मुलांची अभ्यासातही प्रगती दिसून येते.. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी काही खास टिप्स..
3 / 7
मुलांची पुस्तकांशी गट्टी होणं खूप गरजेचं आहे. यामुळे मुलांचे ज्ञान तर वाढतेच पण क्रियेटीव्हीटी, शब्दसंग्रहसुद्धा वाढतो. त्यामुळे मुलांची आवड आणि वय या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन त्यांना पुस्तकं आणून द्या. त्यांना ती वाचण्याची सवय लावा.
4 / 7
मुलांसाठी त्यांच्या वयानुसार मेमरी गेम आणा आणि तुम्हीही त्यांच्यासोबत ते खेळा. यामुळे त्यांची एकाग्रता, प्रश्नाची उकल करण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे बुद्धीला चालना मिळते.
5 / 7
मुलांच्या जेवणात अधिकाधिक सुकामेवा, फळं, हिरव्या पालेभाज्या असू द्या. यामुळे आरोग्य चांगले राहाते आणि त्याचा चांगला परिणाम त्यांच्या अभ्यासावरही दिसून येतो.
6 / 7
मुलांसाठी जागरण करणं अजिबात चांगलं नाही. त्यामुळे त्यांना वेळेत झोपवा आणि सकाळी लवकर उठवा.
7 / 7
स्क्रिन टाईम अतिशय कमी ठेवा. कारण स्क्रिन पाहण्यात त्यांचा मेंदू बिझी झाला की मग अन्य विचार डोक्यात येणं, एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल वाटून त्याविषयी जाणून घेण्याची उत्सूकता निर्माण होणं हे सगळं कमी होत जातं.
टॅग्स : पालकत्वलहान मुलंपरीक्षा