5 Ways to break smartphone addiction in children, How to keep children away from mobile?
मुलं सारखं मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतात? ५ टिप्स- मुलांचं मोबाईलचं व्यसन होईल कमीPublished:February 19, 2024 04:05 PM2024-02-19T16:05:48+5:302024-02-19T16:13:23+5:30Join usJoin usNext मुलं सारखं मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली असतात, अशी बहुसंख्य पालकांची तक्रार असते. मुलांचं हे मोबाईलचं व्यसन कमी कसं करायचं, हा प्रश्न त्यांच्या पालकांना छळत असतो. (5 Ways to break smartphone addiction in children) तुमच्याही मुलांना सारखा मोबाईल लागत असेल तर या काही गोष्टी करून पाहा. मुलांचं मोबाईलचं व्यसन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. (How to keep children away from mobile?) यासाठी करता येण्यासारखी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांसमोर तुम्हीही स्क्रिन बघणं टाळा. बऱ्याचदा पालकांच्या हातात मोबाईल पाहून मुलांनाही मोबाईल घ्यावा वाटतो मुलांना स्क्रिन बघण्यासाठी १५ मिनिटे, अर्धा तास किंवा तुमच्या हिशोबाने ठराविक वेळ ठरवून द्या. त्यानंतर मात्र मोबाईल न बघण्याची त्यांना सक्ती करा. दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, चहा, नाश्ता अशा ठराविक वेळी तसेच बेडरूम, वाॅशरूम याठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यास बंदी करा. मुलांना गोष्टींची पुस्तकं, वेगवेगळे खेळ आणून द्या आणि तुम्हीही त्यांच्यासोबत ते खेळा. थोडा वेळ काढून मुलांना बाहेर घेऊन जा. त्यांची आसपासच्या मुलांशी मैत्री करून द्या आणि त्यांना मैदानावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत खेळण्यास प्राधान्य द्या. टॅग्स :पालकत्वलहान मुलंमोबाइलParenting TipskidsMobile