Join us   

टीनएज सुरु होण्यापूर्वी मुलांना शिकवायलाच हव्यात ‘या’ गोष्टी, अभ्यासही करतील-वळणही लागेल चांगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2024 1:39 PM

1 / 7
साधारण १० वर्षांचे होईपर्यंत मुलं स्वैरपणे वागत असतात. त्यानंतर मात्र त्यांना योग्य पद्धतीने घडवणं पालकांच्या हातात असतं. कारण त्यानंतर त्यांना ज्या सवयी लागतात किंवा ज्या गोष्टी त्यांच्या अंगवळणी पडतात, त्यानंतर त्या बदलणं अवघड होतं. म्हणूनच साधारण वयाच्या १३ व्या वर्षीपर्यंत म्हणजेच मुलं टीनएजर्समध्ये प्रवेश करण्याआधी पालकांनी त्यांना काही गोष्टींची सवय लावणं गरजेचं आहे.
2 / 7
पहिली सवय म्हणजे मुलांना पैशांचं महत्त्व समजावून सांगा. आपल्यासाठी खरंच काय गरजेचं आहे, कुठल्या गोष्टींसाठी पैसा खर्च करणं महत्त्वाचं आहे, हे मुलांच्या लक्षात यायला हवं.
3 / 7
मुलांना दररोज ठराविक वेळी अभ्यासाला बसण्याची सवय लागलीच पाहिजे. त्यांच्या इयत्तेनुसार तो वेळ कमी- जास्त असेल, पण एका ठराविक वेळेला त्यांनी बसून अभ्यास केलाच पाहिजे.
4 / 7
आपल्या वस्तू, अभ्यासाची पुस्तकं, वह्या, दप्तर, डबा, वॉटर बॅग, कपडे हे सगळं जागच्याजागी व्यवस्थित ठेवण्याची सवय मुलांना लावा. यामुळे मुलांच्या अंगात आपोआपच एक प्रकारची शिस्त येते.
5 / 7
स्वयंपाक घरातल्या किंवा घरातल्या लहान मोठ्या कामांमध्ये मुलांची मदत जरूर घ्या. घरातलं असं कुठलं तरी एक काम मुलांना दररोज नेमाने करायला लावा. त्यांच्या वयानुसार ते काम हलकं-फुलकं असावं. पण त्या कामाची जबाबदारी रोजच्या रोज मुलांकडेच द्या.
6 / 7
आपण कुठे पडलो, आपल्याला काही लागलं तर अशावेळी काय करावे, स्वतःवर लगेचच्या लगेच कसे प्रथमोपचार करून घ्यावेत, याविषयी मुलांना माहिती हवी.
7 / 7
वैयक्तिक स्वच्छतेची सवय मुलांना याच काळात लागते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सांगा. त्यांचे रोजचे कपडे टापटीत असावेत, केस व्यवस्थित विंचरलेले असावेत, अशा लहानसहान गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटत नसल्या तरीही त्या मुलांना शिस्त लागण्यासाठी अतिशय गरजेच्या आहेत.
टॅग्स : पालकत्वलहान मुलं