वयाच्या ४५व्या वर्षी दत्तक घेतली मुलगी, साक्षी तन्वर सांगते सोपं नसतंच एकटीने सगळं करणं पण.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 6:46 PM 1 / 6'कहानी घर घर की' मधली 'पार्वती' ही तिची सगळ्यात पहिली ओळख. पण आज मात्र ती मालिका, जाहिराती यांच्याप्रमाणेच हिंदी चित्रपटांमधूनही आपल्या भेटीला येत असते. साक्षी तन्वर हे आता बहुतांश लोकांच्या ओळखीचं नाव. 2 / 6तिची भूमिका असणारा शर्मा जी की बेटी हा सिनेमा नुकताच रिलिज झाला. यानिमित्त एका खाजगी वाहिनीने तिची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये साक्षीला ती तिचं काम आणि तिची मुलगी या दोन्ही गोष्टी कशा काय सांभाळते, याविषयी एक प्रश्न विचारला होता. 3 / 6साक्षीने लग्न केलेलं नसलं तरी २०१८ साली दित्या या मुलीला तिने दत्तक घेतलं. सिंगल पॅरेंट असल्याने साहजिकच तिच्यावरची जबाबदारी अधिक आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली की मुलं आणि तुमचं काम या दोन्ही गोष्टी एकाचवेळी सांभाळणं हे खरंच चॅलेंजिंग आहे. 4 / 6कारण तुमच्या मुलांना तुमचा वेळ आणि अटेंशन पाहिजे असतं. तुमच्या कुटूंबाला तुमच्याकडून काही अपेक्षा असतात. एक चांगली आई होण्यासाठी तुमची स्वत:ची धडपड सुरू असते आणि त्याच वेळी तुमच्यामागे तुमचं स्वत:चं काम, तुमची स्वप्नही असतात. हे सगळं सांभाळणं खूप कठीण आहे. पण मला ते जमलं आहे, कारण...5 / 6माझं काम इतर वर्किंग वुमनसारखं नाही. मला रोज उठून १० ते ६ घराबाहेर राहावं लागत नाही. मी वर्षातले ५० ते ६० दिवसच काम करते आणि माझ्या मुलीच्या वेळा पाहून शुटिंग ॲडजस्ट करू शकते. असं करूनही जेव्हा गरज पडतेच, तेव्हा मदतीला माझी आई, बहिणी आणि इतर कुटूंबिय माझ्या मदतीला असतातच. त्यामुळेच कामासोबतच आईपण सांभाळणं मला तुलनेने थोडं सोपं जातं.6 / 6साक्षी म्हणते आईपण हे शिकवून समजत नाही. मुलांनी त्रास दिल्यावर काय करावं, हे कोणत्या पुस्तकात लिहिलेेलं नाही. ते तुमचं तुम्हाला शिकून घ्यावं लागतं आणि ती वेळ सांभाळून न्यावी लागते.. आणखी वाचा Subscribe to Notifications