मुलांची क्रिएटिव्हिटी वाढवणारे भन्नाट पेपरक्राफ्ट! आई बोअर होतंय काय करु? या प्रश्नाचं भन्नाट उत्तर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 9:30 AM 1 / 8१. आजकाल मुलांना सारखी काहीतरी करमणूक हवी असते. कशात गुंतून नसतील तर मग दिमतीला सारखा टीव्ही तरी लागतोच. मुलांचा टीव्ही, मोबाईल कमी करण्यासाठी आणि करमणुकीतून त्यांचा बौद्धिक विकास होण्यासाठी या काही सोप्या सोप्या गोष्टी त्यांना करायला लावा. सुरुवातीला हे करण्याचाही त्यांना कंटाळा येईल, तुमचं ऐकणार नाहीत. पण तरीही त्यांच्या मनाने, त्यांच्या कलाकलाने घ्या आणि या काही गोष्टींमधून त्यांना नविन काहीतरी करण्याची, क्रियेटीव्हिटीची गोडी लावा.2 / 8२. यासगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कोणताही नवा खर्च करायचा नाहीये. जे सामान घरात असेल, त्याचा उपयोग करून मुलांना या गोष्टी करायला लावा. यातूनच त्यांची क्रियेटीव्हिटी आणखी वाढत जाईल. प्रत्येक गोष्टीचा काही ना काही आकार होतो, उपयोग होतो, हे एकदा लक्षात आलं की आपोआपच त्यांची वेगवेगळ्या गोष्टींकडे कलात्मकतेने पाहण्याची दृष्टी विकसित होत जाईल.3 / 8३. घरात असणाऱ्या थर्माकोलच्या प्लेट आणि ग्लास वापरून हे असं सुंदर पेन स्टॅण्ड करता येईल. यावर पाहिजे त्या नक्षी काढून मुलांना सजावट करायला लावा. सुरुवातीला मुलांना परफेक्ट जमणार नाहीच. ते चुकणारच. पण चुकले तरी त्यांना रागावून त्यांचा इंटरेस्ट घालू नका. उलट जे केलंय त्याचं कौतूक करा.4 / 8४. बागेतली झाडांची गळून पडलेली पानं, फुलं अशा पद्धतीने छान उपयोगात आणता येतील. एखाद्याला ग्रिटिंग देण्यासाठी त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो.5 / 8५. पिग्गी बँक अनेक मुलांची आवडती. त्यात पैसे जमा करण्यात मुलांना वेगळाच आनंद असतो. आणि ही पिग्गी बँक जर त्यांनी स्वत:च्या हाताने तयार केली असेल तर त्याचा आनंद नक्कीच वाढणार. म्हणूनच पिग्गी बँक विकत आणून देण्यापेक्षा घरच्याघरी रिकाम्या बाटल्यांपासून अशा पद्धतीने तयार करा. 6 / 8६. मुलांच्या पेन, पेन्सिल, खोडरबर, रंग अशा वस्तू घरभर पडलेल्या असतात. अशा पद्धतीने रिकाम्या बाटल्यांचे स्टॅण्ड त्यांना बनवायला लावा आणि त्यातच वस्तू जागच्याजागी ठेवायची शिस्त लावा. सुरुवातीला टाळाटाळ करतील, पण नंतर आपोआपच जिथली वस्तू तिथे ठेवण्याची सवय लागेल.7 / 8७. घरात, गार्डनमध्ये किंवा मुलांच्या खोलीत लावण्यासाठी अशा पद्धतीने आईस्क्रिमच्या काड्या वापरून घर तयार करता येईल. जुन्या पुस्तकांमध्ये, वह्यांच्या कव्हरवर अशी अनेक चित्रे असतातच, ती कापून हे काड्यांचे घर सजवता येईल्.8 / 8८. घरातल्या मंडळींसाठी अशा पद्धतीची फोटोफ्रेम करता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications