मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या ६ गोष्टी, मेंदू होईल तल्लख, अभ्यासात करतील प्रगती

Published:August 23, 2024 02:51 PM2024-08-23T14:51:12+5:302024-08-23T15:00:25+5:30

मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या ६ गोष्टी, मेंदू होईल तल्लख, अभ्यासात करतील प्रगती

मुलांची जडणघडण व्यवस्थित झाली तर त्याचा परिणाम निश्चितच त्यांच्या अभ्यासावर दिसून येतो. त्यामुळेच तर मुलांच्या खाण्या- पिण्याकडे, शारिरीक हालचालींकडेही पालकांनी व्यवस्थित लक्ष द्यावं, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात (how to boost memory power or intelligence of kids). आता आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत, ज्याचा परिणाम मुलांच्या शारिरीक अणि बौद्धिक विकासावर होतो. यामुळे मग निश्चितच ते अभ्यासातही प्रगती करतात. (6 simple tips and tricks for the brain development of kids)

मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या ६ गोष्टी, मेंदू होईल तल्लख, अभ्यासात करतील प्रगती

यातली पहिली गोष्ट म्हणजे मुलांना ओमेगा ३ फॅटी असणारे पदार्थ पुरेशा प्रमाणात दररोज खाऊ घालणे. यासाठी अक्रोड हा एक उत्तम पर्याय असू शकतो. ओमेगा ३ मेंदूसाठी अतिशय उपयुक्त ठरते.

मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या ६ गोष्टी, मेंदू होईल तल्लख, अभ्यासात करतील प्रगती

मुलांना कोणता ना कोणता मैदानी खेळ शिकवा आणि दिवसाचा १ तास त्यांचा त्या खेळासाठी राखून ठेवा. मुलं जेवढी शारिरीकदृष्ट्या ॲक्टीव्ह राहतात, तेवढा त्यांचा मेंदू अधिक तल्लख होत जातो.

मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या ६ गोष्टी, मेंदू होईल तल्लख, अभ्यासात करतील प्रगती

मेंदूला आराम मिळून त्याच्या विकासाला वाव मिळण्यासाठी मुलांना पुरेशी झोप मिळणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळे रात्री लवकर मुलं झोपी जातील, याकडे लक्ष द्या.

मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या ६ गोष्टी, मेंदू होईल तल्लख, अभ्यासात करतील प्रगती

मुलांचा स्क्रिनटाईम कमी करा. कारण यामुळे मुलं त्यात अडकून जातात आणि आजुबाजुच्या परिस्थितीचे आकलन करून त्यातून काही बोध घेणे, नव्या गोष्टी शिकणे, वेगवेगळे अनुभव घेणे असं आपोआपच कमी होत जातं. ते मुलांच्या बौद्धिक विकासासाठी मारक आहे.

मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या ६ गोष्टी, मेंदू होईल तल्लख, अभ्यासात करतील प्रगती

वयोमानानुसार मुलांसाठी वेगवेगळे मेमरी गेम मिळतात. ते गेम त्यांच्या बौद्धिक विकासासाठी उपलब्ध ठरतात. असे वेगवेगळे खेळ मुलांना नक्की आणून द्या आणि त्यांच्यासोबत ते खेळा. त्यामुळे त्यांच्यामध्ये असे बौद्धिक खेळ खेळण्याची आवड निर्माण होईल.

मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या ६ गोष्टी, मेंदू होईल तल्लख, अभ्यासात करतील प्रगती

मुलांना सोशली ॲक्टीव्ह ठेवा. वेगवेगळ्या गटातील मुलांसोबत त्यांचा संवाद वाढवा. त्यांच्या वयाच्या मुलांशी संवाद साधण्यासाठी, मैत्री करण्यासाठी त्यांना नेहमी प्रोत्साहित करा.