1 / 6मुलं ऐकतच नाहीत, व्यवस्थित खात नाहीत, अभ्यास करत नाहीत अशी बहुतांश पालकांची तक्रार असते. मुलांना चांगलं वळण लावायचं असेल तर सगळ्यात आधी पालकांनी स्वत:मध्ये तसा बदल करणं आवश्यक आहे. पण त्यासोबतच या काही गोष्टीही नक्की करून पाहा.. यामुळे तुमची मुलंही गुणी- समजूतदार आणि हुशार होतील.2 / 6मुलांना खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी नाहीत ही कित्येक आईंची तक्रार असते. त्यासाठी मुलांना कधीतरी एखादा पौष्टिक पदार्थ करताना तुमच्यासोबत घ्या. अगदी हसत खेळत त्यांची मदत घ्या. तो पदार्थ खूप छान पद्धतीने सजवून मुलांसमोर ठेवा. तुम्हीही त्यांच्यासोबत आस्वाद घेत तो खा.. हळूहळू त्यांनाही तसं खाण्याची सवय लागेल.3 / 6मुलांनी रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं यासाठी मुलांचं दिवसभराचं शेड्यूल फिक्स असणं गरजेचं आहे. त्यांची रात्री झाेपण्याची वेळ बिघडू देऊ नका. एका ठराविक वेळेत त्यांना झाेपण्याची सवय लावाच. म्हणजे आपोआप सकाळी लवकर जाग येते.4 / 6मुलांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी दिवसातला एक ठराविक वेळ ठरवा आणि त्या वेळेत त्यांना अभ्यासाला बसवाच.. अभ्यासाची वेळ कटाक्षाने पाळायला त्यांना सक्ती करा. हळूहळू ते स्वत:च वेळेवर अभ्यासाला बसतील.5 / 6मुलांना व्यायामाची सवय लागणंही गरजेचं आहे. यासाठी सकाळी त्यांना लवकर उठवा आणि तुमच्यासोबत सायकलिंग, योगा, रनिंग, स्विमिंग असा त्यांना जो काेणता व्यायाम आवडेल तो करा. किंवा त्यांना दिवसातून एखादा तास तरी न चुकता मैदानी खेळ खेळायला लावा. 6 / 6मुलांना स्वच्छतेची सवय योग्य वयात लागणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना ब्रश करणे, आंघोळ, स्वच्छ कपडे घालणे, आजुबाजुचं वातावरण स्वच्छ ठेवणे या गोष्टी वेळीच शिकवा. त्यांचं अभ्यासाचं, कपड्यांचं कपाट त्यांना त्यांच्या पद्धतीने लावू द्या. तुम्ही त्यांना मदत मात्र नक्की करा. सुरुवातीला लगेचच त्यांना सगळं अगदी परफेक्ट जमणार नाही. त्यामुळे तशी अपेक्षाही करू नका. पण ही कामं वारंवार केल्यास हळूहळू त्यांच्यात नक्कीच सुधारणा होईल.