Join us

पालकांनी वाढत्या वयातल्या मुलांसमोर कधीच बोलू नयेत ५ गोष्टी, मुलांवर होतील वाईट परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2025 12:52 IST

1 / 7
मुलं मोठी व्हायला लागली की त्यांच्यासमोर कसं बोलायचं याचं थोडं भान पालकांनी ठेवायलाच हवं. कारण वरवर पाहता मुलं खेळात गुंग असल्याचं दिसतं. पण तसं नसतं. त्यांचं बरंचसं लक्ष पालकांच्या बोलण्याकडेच असतं.(parenting tips)
2 / 7
तुम्हीही पालक म्हणून बऱ्याचदा या गोष्टीचा अनुभव घेत असालच. म्हणूनच मुलांसमोर कोणत्या गोष्टी बोलणं पालकांनी कटाक्षाने टाळायला हवं ते एकदा बघा (5 things parents should not discuss in front of growing kids). याविषयीची माहिती पॅरेंटींग एक्सपर्टने फेसबूक पेजवर शेअर केली आहे.
3 / 7
त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या आर्थिक गोष्टी मुलांसमोर बोलू नका. तुमच्याकडे किती जास्त पैसा आहे किंवा तुम्ही खूप आर्थिक अडचणीमध्ये आहात हे मुलांसमोर बोलणं टाळावं. या गोष्टी चुकीच्या पद्धतीने मुलांपर्यंत गेल्यास त्याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो.
4 / 7
दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणत्याही नातलगाबद्दल, मित्रमैत्रिणींबद्दल मुलांसमोर कधीही वाईट बोलू नका. त्यांना नावं ठेवू नका.
5 / 7
पालकांनी मुलांसमोर मुलांच्या शिक्षकांविषयी, शाळेविषयी, क्लासेसविषयी नकारात्मक बोलणं टाळावं.
6 / 7
मुलांमध्ये असणाऱ्या चांगल्या सवयी किंवा वाईट सवयींचा आपल्या बोलण्यात सतत उल्लेख करणं टाळा. तुम्हाला मुलांचं नेहमीच त्यांच्यासमोर खूप कौतूक करण्याची सवय असेल तर त्याने मुलं गरजेपेक्षा जास्त लाडावू शकतात. किंवा त्याउलट तुम्ही नेहमीच मुलांना नावं ठेवत असाल तर त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास जाऊ शकताे.
7 / 7
पती- पत्नी म्हणून तुमच्या नात्यांमध्ये जर काही कलह असेल, वाद असतील तर ते सुद्धा मुलांसमोर कधीही बोलून दाखवू नका.
टॅग्स : पालकत्वलहान मुलं