Join us

महाश्रीमंत एलन मस्क म्हणजे कडक शिस्तीचा बाप, त्यांच्या मुलांना कराव्याच लागतात रोज ४ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2025 19:03 IST

1 / 8
प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांनी त्यांच्या मुलांना चांगलं वळण लागावं म्हणून जे काही नियम ठरवून दिले आहेत ते नियम मुलांच्या उत्तम जडणघडणीसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. मुलांना शिस्त लागावी, चांगलं वळण लागावं म्हणून काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर एलन मस्क यांचे हे ७ नियम पाहा.. तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्हाला ते नक्कीच उपयोगी पडू शकतात..
2 / 8
संघर्ष केल्याशिवाय जीवनात यश नाही हे एलन मस्क यांनी स्वत:च्याच उदाहरणातून चांगले जाणले आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी काही गोष्टींना मुलांनी स्वत:च सामोरे गेले पाहिजे, असं त्यांना वाटतं.
3 / 8
चांगल्या गोष्टींच्या बाबतीत त्याच्या मुलांनी त्यांचं अनुकरण करावं, असाही त्याचा एक नियम आहे.
4 / 8
एलन मस्क यांचा एक नियम म्हणजे व्हिडिओ गेम जेवढा खेळाल त्याच्या दुप्पट वेळ अभ्यासाला किंवा वाचनाला द्या. एलन मस्क यांना त्यांच्या लहानपणी व्हिडिओ गेम खेळण्याची खूप आवड होती. त्याच आवडीतून त्यांनी अनेक संगणकीय प्रोग्राम तयार केले. त्यामुळे मुलांनी व्हिडिओ गेम खेळायला त्यांनी ना नाही. पण त्याच्या दुप्पट वेळ मात्र त्यांनी अभ्यासात किंवा वाचनात घाललावा असा त्यांचा आग्रह असतो.
5 / 8
कुटूंबियांसोबत वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तो कामामध्ये कितीही व्यस्त असला तरी कुटूंबासाठी, मुलांसाठी नक्की वेळ काढतो.
6 / 8
मुलांचं आरोग्य जपायचं तर त्यांचा आहार उत्तम असायलाच हवा असा त्यांचा तिसरा नियम. त्यामुळे जंकफूड न खाता पौष्टिक आहार मुलं कसा आनंदाने खातील यावर त्यांचा भर असतो.
7 / 8
मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम होण्यासाेबतच त्यांच्या विचारशैलीला, कौशल्यांना वाव देण्यासाठी योग्य ते शिक्षण देणारी शाळा एलन मस्क यांनी स्वत:च सुरू केली आहे. त्या शाळेत मुलांनी नियमितपणे गेलेच पाहिजे हा त्यांचा चौथा नियम आहे.
8 / 8
इंटरनेटचा उपयोग मुलांनी अभ्यास करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठीच करून घेतला पाहिजे.
टॅग्स : पालकत्वएलन रीव्ह मस्कलहान मुलं