Join us   

मुलांनी मोठं होऊन नाव कमावावं असं वाटतं? ५ सवयी लहानपणीच लावा, समजदार होतील मुलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 9:28 AM

1 / 6
आपल्या मुलांचे भवितव्य उज्जवल असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. त्यासाठी ते भरपूर प्रयत्न करतात. चांगल्या शाळेची निवड करण्यापासून अभ्यास घेण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी केल्या जातात. पण सध्याच्या स्थितीत तुमचे मुलं सक्सेसफूल व्हावं असं तुम्हाला वाटत असेल किंवा इतर एक्टिव्हीटीजमध्ये सहभाग घ्यावा असं वाटत असेल तर तर काही गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या. जेणेकरून मुलं यशस्वी होतील.
2 / 6
जर तुमचं मूल चिडचिडं असेल तर त्याला नवीन गोष्टी शिकण्यात इंस्ट्रेस्ट दाखवायला शिकवा. ज्यामुळे मुलांना पुढे जाऊन फायदा होईल.
3 / 6
मुलांना रागावर नियंत्रण ठेवायला शिकवा. ज्यामुळे मुलं शांत राहतील आणि हेल्थ आणि करिअरवर फोकस करतील.
4 / 6
जर तुमचे मूल नवीन गोष्टी आणि पद्धती शिकण्यास उत्सुक असेल, तर मूल भविष्यात सर्जनशील होऊ शकते, जे त्याच्या भविष्यासाठी चांगले असू शकते.
5 / 6
जर तुमचे मूल लहानपणापासूनच अभ्यास आणि खेळ यांच्यात यांच्याच चांगला वेळ घालवत असेल तर त्याची टाईम मॅनेजमेंटची ही सवय त्याच्यासाठी चांगली आहे.
6 / 6
जर तुमचा मुलगा नवीन व्यक्तीशी बोलण्यास संकोच करत नसेल, तर तो भविष्यात तुमच्यासाठी योग्य असेल.
टॅग्स : पालकत्वलहान मुलं