मुलं हट्ट करतात-ओरडा खाऊनही शिस्त लागत नाही? Time-Out टेक्निक वापरा, मुलांना लागेल चांगले वळण By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 4:32 PM 1 / 7पेरेंटीग एक मोठी जबाबदारी असते. मुलांच्या चांगल्या वाईट वर्तनाचे पूर्ण क्रेडिट पालकांना जाते. यासाठी मुलांपासून पालकांपर्यंत सगळेच एक्स्ट्रा कॉन्शियस राहतात. 2 / 7पालक मुलांची चूक झाल्यानंतर त्यांना कधी ओरडतात तर कधी मारतात. आजकाल पालक टाईम आऊटचा फॉम्यूला वापरत आहेत. 3 / 7टाईम आऊट पद्धतीत मुलांना त्यांची चूक कळते. याचा फायदा फक्त मुलांना होत नाही तर पालकांनाही होतो. या पद्धतीत मुलं चुका करतात तेव्हा त्यांना ओरडून किंवा मारून समजावलं जात नाही तर त्यांना एखाद्या खोलीत एकटं सोडलं जातं. 4 / 7ज्या ठिकाणी त्यांना एंटरटेनमेंटसाठी कोणताही पर्याय नसतो. घरातले इतर सदस्यही बोलायला नसतात. अशा स्थितीत मुलांना विचार करायला वेळ मिळतो आणि त्यांना चूक बरोबर यातील फरक कळतो. 5 / 7मन शांत ठेवल्याने त्यांना चुकांबद्दल आकलन होते. या पद्धतीने मुलं मेंटली स्ट्राँग होतात. त्यांना वाढत्या वयात मदत होते. 6 / 7ओरण्याशिवाय किंवा मारण्याशिवाय हा उपाय केल्यास मुलांना लवकरात लवकर त्यांची चूक समजते. ज्यामुळे ते पुन्ही चुक करत नाहीत. 7 / 7पालकांनी सांगितल्या गोष्टी ऐकतात. या सिद्धांमुळे मुलांना आत्मपरिक्षण करता येते. या बिहेविअरमुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications