1 / 7लहान मुलांचं वजन वाढत नसेल तर त्यांच्या आई- बाबांना आणि विशेषत: आईलाच त्याचं जास्त टेन्शन येतं. बऱ्याच मुलांची खाण्यापिण्याची तक्रार असतेच.. त्यामुळे असं काय खाऊ घालावं त्यामुळे त्यांचं वजन वाढेल असा प्रश्न पडतोच.2 / 7म्हणूनच बघा त्या प्रश्नाचं हे सोपं उत्तर. तुमच्या मुलांचं वजन वाढत नसेल तर त्यांना पुढे सांगितलेले काही पदार्थ नियमितपणे खाऊ घाला. यापैकी कोणतेही २ ते ३ पदार्थ नियमितपणे त्यांच्या आहारात असले तरी चालेल. मुलांची तब्येत सुधारून वजन वाढण्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.3 / 7सगळ्यात पहिला पदार्थ आहे केळी. केळी अतिशय आरोग्यदायी असून भराभर वजन वाढण्यासाठी उपयुक्त आहे. शिकरण किंवा बनाना शेक या माध्यमातून केळी देण्यापेक्षा रोज १ नुसतं केळ खाऊ द्या. 4 / 7दुसरा पदार्थ आहे दूध. दुधामुळेही वजन वाढण्यास मदत होते. या दुधात जर तुम्ही घरी तयार केलेली सुकामेव्याची पावडर टाकून दिली तर ते अधिक उत्तम...5 / 7खजूर आणि अंजीर हे दोन पदार्थ वजन वाढण्यास उपयुक्त ठरतात. मुलं हे पदार्थ नुसते खाण्यास कंटाळा करत असतील तर त्यांचा शेक बनवून मुलांना द्या. मुलं तो आवडीने घेतील आणि वजन वाढण्यासही फायदा होईल.6 / 7दररोज रात्री ५ ते ६ मनुका पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलांना द्या.. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत हाेईल.7 / 7बटाटा नियमितपणे खाल्ल्यानेही वजन वाढतं. म्हणूनच बटाट्याचे पराठे, भाजी, कटलेट्स किंवा इतर पदार्थ मुलांना नियमितपणे खायला द्या.