Barack obama and michelle love story : ऐसी भी एक लव्हस्टोरी! बराक ओबामा 25 वर्षांच्या मिशेलच्या प्रेमात पडले आणि....
Updated:October 4, 2021 16:57 IST2021-10-04T16:38:40+5:302021-10-04T16:57:29+5:30
Barack obama and michelle love story : 1991 मध्ये बराक ओबामा यांनी मिशेलसोबत डिनरमध्येच साखरपुडा केला आणि एका वर्षानंतर दोघांनी लग्न केले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा सोशल मीडियावर पोस्ट्स शेअर करत एकमेकांना प्रेमपूर्वक शुभेच्छा देत 29 वा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. हे दोघे जगभरातील अनेक जोडप्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी ठरले आहेत.
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या पत्नीसोबत 29 वा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन फोटो शेअर केले. एका फोटोत ते एकमेकांना प्रेमाने मिठी मारत पलंगावर बसलेले दिसत आहेत आणि दुसरा खिडकीजवळ उभे असताना मागून क्लिक केलेला फोटो आहे. फोटो शेअर करताना बराक ओबामा यांनी आपल्या पत्नीसाठी एक प्रेमाची नोट लिहिली आणि म्हटले की तो तिच्याशिवाय जगण्याची कल्पना करू शकत नाही.
"वाढदिवसाच्या शुभेच्छा, माईक! गेल्या २९ वर्षांपासून, जग तुम्हाला फक्त साऊथ साइडची मुलगी म्हणून नव्हे, तर आई, वकील, कार्यकारी, लेखक, फर्स्ट लेडी आणि माझी सर्व काही म्हणून ओळखते. मी तुझ्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही, "ओबामांनी त्यांच्या पोस्टला असे कॅप्शन दिले.
या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली तेव्हा बराक २८ वर्षांचे होते आणि मिशेल २५ वर्षांच्या होत्या. बराक ओबामा सध्या 60 वर्षांचे आहेत आणि मिशेल ओबामा 57 वर्षांच्या आहेत. दोघांच्या लग्नाला 29 वर्षे झाली आहेत. बराक आणि मिशेल यांच्या सुंदर लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया.
बराक ओबामा आणि मिशेल यांची सुंदर प्रेमकहाणी लोकांसाठी प्रेरणादायी आहे. बराक ओबामा 2009 ते 2017 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी मिशेल यांची 1989 मध्ये लॉ फर्म सिडली ऑस्टिन एलएलपीमध्ये भेट घेतली. मिशेल बराक ओबामांचे मार्गदर्शक म्हणून येथे काम करत होती. हा तो काळ होता जेव्हा मिशेल आणि बराक ओबामा एकमेकांना डेट करू लागले. दोन वर्षांनंतर दोघांनी लग्न केले.
बराक ओबामा आणि मिशेल यांची एंगेजमेंटसुद्धा आश्चर्यापेक्षा कमी नव्हती. 1991 मध्ये बराक ओबामा यांनी मिशेलसोबत डिनरमध्येच साखरपुडा केला आणि एका वर्षानंतर दोघांनी लग्न केले. बराक ओबामा बारची परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या उत्सवात ही डीनर डेट ठरवली होती.
एबीसी न्यूजशी बोलताना मिशेल यांनी एकदा सांगितले की, एक वेटर मिठाई आणि ट्रे आणत होता. त्या ट्रे मध्ये एक अंगठी होती जी अतिशय सुंदर घटना होती. यानंतर बराक ओबामा गुडघ्यावर खाली बसले आणि त्यांनी ती अंगठी मला घातली.
बराक आणि मिशेल यांचा विवाह 3 ऑक्टोबर 1992 रोजी झाला. बराक आणि मिशेलची मुलगी मालियाचा जन्म 4 जुलै 1998 रोजी झाला होता. दुसरी मुलगी साशाचा जन्म 2001 मध्ये झाला.
2004 मध्ये ओबामा यांची अमेरिकन सिनेटमध्ये निवड झाली. 2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले. (Image credit- Google)