Relationship : लग्न मोडलं पण घटस्फोटानंतरही मैत्री तुटली नाही, हे कसं जमलं या जोडप्यांना? पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 11:03 AM 1 / 8बॉलिवुडच्या जोडप्यांमध्ये किंवा इतर सेलिब्रिटींचे घटस्फोट होणं यात काहीच नवीन नाही. अनेक जोडपी अशी आहेत जी घटस्फोट घेतल्यानंतरही एक्स पार्टनरसह मैत्रीपूर्ण नातं टिकवून आहेत. तर काही जोडपी घटस्फोनंतर एकत्र कधीच दिसली नाहीत. 2 / 8या दोघांच्या नातेसंबंधाचा औपचारीक शेवट झाला असला. पण गायक ग्रिम्स अजूनही अब्जाधीश एक्स बॉयफ्रेंड एलोन मस्कसोबत राहत आहे. गेल्या महिन्याच्या पेज सिक्सच्या अहवालानुसार, मस्कने सेलिब्रिटी न्यूज पोर्टलसह शेअर केले होते की ते आणि ग्रिम्स 'अर्ध-विभक्त' आहेत. ब्रेकअपनंतरही त्यांनी एकमेकांसह मैत्रीपूर्ण संबंध ठेवले आहेत. 3 / 8या दोघांचे लग्न देखील 14 वर्षे टिकले आणि दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते. एवढेच नाही तर दोघेही घटस्फोटानंतरही मित्र म्हणून एकत्र राहत आहेत, पण नोव्हेंबर 2014 मध्ये जेव्हा त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. या घटस्फोटामागे कंगना राणावत आणि अर्जुन रामपाल हेच खरे कारण असल्याची चर्चा होती. हृतिक रोशनने सुजैनला पोटगी म्हणून सुमारे 380 कोटी दिले.4 / 8मलायका आणि अरबाज खानचे लग्न 18 वर्षे टिकले आणि 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तसे, दोघेही 2016 पासून वेगळे झाले. दोघांना एक मुलगा देखील आहे आणि मलायका आणि अरबाजच्या या दीर्घ नात्यात विभक्त होण्याचे कारण अरबाजच्या सवयींचे दिले जात होते. मात्र, अरबाज आणि मलायका दोघेही आता त्यांच्या नात्यात पुढे सरसावले आहेत.5 / 8९० च्या दशकातील टॉप अभिनेत्री अमृता सिंगने जेव्हा नवाब पतौडीचा मुलगा अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले तेव्हा तिच्यावर बरीच चर्चा झाली. एक, हे लग्न हिंदू आणि मुस्लिम वादाचे कारण बनले आणि या लग्नाबाबत अनेक वाद झाले. हे लग्न 1991 ते 2004 पर्यंत टिकले आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. दोघेही त्यांच्या घटस्फोटाबद्दल बरीच चर्चेत आहेत. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांना घटस्फोटामध्ये 5 कोटी रुपये पोटगी म्हणून देण्यात आली आणि त्यांचा मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत त्यांना अमृताला दरमहा 1 लाख द्यावे लागले.6 / 8२००० मध्ये दोघांनी 16 वर्षांचे लग्न मोडले आणि एप्रिल 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. या दोघांना दोन मुली आहेत आणि दोघेही आपापल्या नात्यात पुढे गेले आहेत. मात्र, इतर जोडप्यांप्रमाणे हे दोघे घटस्फोटानंतर फारसे एकत्र दिसले नाहीत.7 / 8सध्याचा सर्वात धक्कादायक घटस्फोट आमिर खान आणि किरण राव यांचा झाला आहे. दोघांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर 3 जुलै 2021 रोजी अधिकृतपणे त्यांच्या विभक्ततेबद्दल सांगितले. घटस्फोटा नंतर दोघे अजूनही एकत्र काम करत आहेत, मुलाला एकत्र वाढवत आहेत आणि एकमेकांना मित्र म्हणून आधार देत आहेत.8 / 8अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया हे या यादीत सर्वात जास्त काळ एकत्र राहिलेले जोडपे आहे. दोघे 21 वर्षे एकत्र होते आणि 2019 मध्ये वेगळे झाले. आता अर्जुन रामपाल त्याची मैत्रीण गॅब्रिएलासोबत खुश आहे आणि दोघांनाही एक मुलगा आहे. मेहेर देखील तिच्या कामावर आणि दोन्ही मुलींवर लक्ष केंद्रित करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications