भाऊबीजेला बहिणीला द्या नेहमीपेक्षा वेगळं गिफ्ट, ७ पर्याय, बहिण-भावाच्या नात्याचे करा खास सेलिब्रेशन... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2023 9:10 AM 1 / 8भाऊबीज म्हणजे बहिणीने भावाला ओवाळणे आणि भावाने तिला आपण कायम तिच्या सोबत आहोत याचे आश्वासन देऊन प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी ओवाळणी देणे. आता या ओवाळणीमध्ये नेहमीपेक्षा वेगळं काय देता येईल ते पाहूया (Diwali Bhaubij Gift options for sisters)...2 / 8तुम्हाला तुमच्या बहिणीला काहीतरी उपयुक्त भेटवस्तू द्यायची असेल, तर तुम्ही कोणत्याही चांगल्या ऑनलाइन शॉपिंग अॅप्सचे किंवा मॉलचे गिफ्ट कार्ड देऊ शकता. त्यामुळे ती तिला हवे तेव्हा तिच्या आवडीची एखादी वस्तू नक्की खरेदी करु शकते. 3 / 8सध्याच्या काळात स्मार्ट वॉच ही अतिशय उपयुक्त अशी गोष्ट असून रोजच्या धावपळीत टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण आपली कामे नक्कीच सोपी करु शकतो. विविध कंपन्यांचे स्मार्ट वॉट बजेटमध्ये बसत असल्याने तुम्ही याचा विचार नक्की करु शकता. 4 / 8बहिणीला ब्यूटी पार्लरमध्ये वारंवार जाण्याची आवड असेल तर तुमच्या शहरातील एखाद्या नामवंत पार्लरमध्ये ब्यूटी ट्रिटमेंट्स घेण्यासाठी तिला तिथले कूपन घेऊन देऊ शकता. मेकअप आणि ब्यूटी ट्रिटमेंट्स आवडणाऱ्या बहिणीला हे गिफ्ट नक्कीच आवडणार.5 / 8तुमचं बजेट अगदी १५-२० हजार किंवा त्याच्या जवळपास असेल, तर बहिणीच्या नावे एखाद्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करणे हा चांगला पर्याय असू शकतो. तिला भविष्यात एखादा मोठा खर्च करण्यासाठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो.6 / 8ब्युटी प्रॉडक्टस हा मुलींना देण्यासाठी एक नक्कीच चांगला पर्याय असू शकतो. त्या वापरत असलेल्या ब्रँडचा अंदाज घेऊन लिपस्टीक, काजळ, लायनर या बेसिक गोष्टी तर तुम्ही नक्कीच गिफ्ट म्हणून देऊ शकता.7 / 8डीनर डेट हा बहिणीला गिफ्ट देण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. अनेकदा बहिण-भाऊ आपापल्या आयुष्यात इतके बिझी असतात की ते एकमेकांसाठी वेळ काढतातच असं नाही. अशावेळी बहिण आणि भाऊ दोघंच एखाद्या छान ठिकाणी फिरायला किंवा डीनरला जाऊ शकतात. 8 / 8पर्स, वॉलेट यांसारख्या गोष्टी मुलींसाठी अतिशय गरजेच्या असतात. सध्या बाजारात ब्रँडेड अशा बऱ्याच छान प्रोफेशनल किंवा कॅज्युअल-पार्टी लूक देणाऱ्या पर्स मिळतात. यातला एखाद्या पर्याय तुम्ही बहिणीसाठी नक्की निवडू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications