Friendship day special : कोण म्हणते ' त्या ' मैत्रिणी नसतात, एकमेकींवर जळतात! बघा, सेलिब्रिटी मैत्रिणींच्या या खास जोड्या Published:August 4, 2024 04:13 PM 2024-08-04T16:13:38+5:30 2024-08-04T16:17:44+5:30
Female Friendships Are Everlasting: A Look at Bollywood Characters Prove It : बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स एकमेकांना टक्कर देताना दिसतात. पण काही लंगोटी यार देखील आहेत.. 'ही दोस्ती तुटायची नाय' आज जागतिक मैत्री दिन (Friendship Day 2024). दोन मैत्रिणी एकमेकींच्या कधीच बेस्ट फ्रेंड्स होऊ शकत नाहीत. असं म्हणतात. सेलिब्रिटी फ्रेंडशिप हे फक्त नावालाच असतात (Bollywood). त्या एकमेकींना कायम पाण्यात पाहतात. असं आपण ऐकलंच असेल. पण बॉलीवूडचे असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या मैत्रीचे किस्से कायम चर्चेत असतात. बेस्ट फ्रेंड्सच्या यादीत नक्की कोणती जोडी किती फेमस आहे. पाहूयात(Female Friendships Are Everlasting: A Look at Bollywood Characters Prove It).
गर्ल गँग अर्थात करिश्मा, करिना- मलायका, अमृता या चौघींची यारी फार फेमस आहे. करिश्मा- करिना आणि आणि मलायका- अमृता या कपूर आणि अरोरा बहिणी बहिणींचं एकमेकींशी खूप जुळतं. या चौघी विदेशात ट्रिपला जातात, पार्टी करतात, एकमेकींचे वाढदिवस साजरे करतात.
सुझेन खान आणि प्रिटी झिंटा या दोघींचीही मैत्री तितकीच फेमस आहे. ऋतिक रोशनच्या माध्यमातून या दोघींची मैत्री झाली, आणि दोघींनी ही मैत्री टिकवूनही ठेवली. प्रीतीसह शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिचीही खूप जवळची मैत्रीण आहे.
सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर हे तिन्ही स्टारकिड्स कायम एकत्र दिसतात. सुहाना शाहरुख खानची लेक, अनन्या चंकी पांडेची कन्या तर शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे. यांची मैत्री अगदी लहानपणीपासूनची आहे.
लहानपणीच आलिया भट आणि अनुष्का रंजन यांची मैत्री खुलली, आणि दोघींनी ती टिकवूनही ठेवली. आलियाच्या स्टारडमचा त्यांच्या मैत्रीवर कणभरही परिणाम झालेला नाही.
'क्योंकी साँस भी कभी बहु थी'मध्ये स्मृती इराणी आणि एकता कपूर यांची मैत्री फुलली, ती आजतागायत टिकून आहे.
जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांची मैत्री बी - टाऊनमध्ये फार फेमस आहे. या दोघीही बॉलीवूडच्या नव्या फळीतील दमदार अभिनेत्री. दोघेही स्टारकिड्स जरी असले तरी, त्यांचं बॉण्डींग घट्ट आहे. या दोघींचे एकत्रित फोटो सोशल मीडियात बरेच व्हायरल होतात.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी बालपणापासून एकमेकींना ओखळतात. दोघींचेही वडील आर्मीत होते. या दोघींची फ्रेंडशिप फार पूर्वीपासून. दोघेही आसामच्या सेंट मेरी स्कूलमध्ये एकत्र होत्या.
बॉलीवूड अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा, या दोघींनीही बालपणात एकत्र शिक्षण घेतले होते. या दोघींचं एकमेकांसोबत खूप जमतं.