Join us   

विश्वकप जिंकताच मेस्सीची पत्नी झाली इमोशनल, बघा तिची व्हायरल पोस्ट आणि दोघांची अनोखी लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 3:22 PM

1 / 7
१. अर्जेंटिना संघाने फुटबॉल विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि पाहता पाहता जगभर एकच जल्लोष झाला. या सगळ्यामध्ये तुफान चर्चेत होता तो अर्जेंटिना संघाचा मेगास्टार लिओनेल मेस्सी..
2 / 7
२. मेस्सीची चर्चा तर जगभर होतच होती. पण त्यासोबतच काही तासांतच अचानक त्याच्या पत्नीची म्हणजेच ॲन्टोनेला रोकुझो हिची इमोशनल पोस्ट व्हायरल झाली आणि मग तिच्याविषयी, त्यांच्या लव्हस्टोरीविषयी अनेक चर्चा रंगू लागल्या..
3 / 7
३. पतीने विश्वचषक जिंकताच रोकुझा अतिशय भावूक झाली होती. पोस्ट लिहिताना ती म्हणतेय की 'सुरुवात कुठून करावी आणि काय बोलावे खरोखरंच समजेना. तु आमचा अभिमान आहेस. आजवर तु काय सहन केलंय हे मी जाणते. म्हणूनच आज तु जे मिळवलंस ते अधिक मौल्यवान आहे. कधीही हार मानायची नाही, हे आम्ही तुझ्याकडूनच तर शिकलोय....', तिची ही पोस्ट सोशल मिडियावर सध्या चांगलीच गाजते आहे.
4 / 7
४. मेस्सी आणि रोकुझो.. ही एक अतिशय रोमॅण्टिक जोडी. त्यांची ही लव्हस्टोरी काही काल- परवाची नाही. अगदी लहानपणापासून दोघांमध्ये मैत्री होती. त्यानंतर ते मैत्रीच्या पुढे गेले आणि त्यांचं प्रेम फुलत गेलं..
5 / 7
५. मेस्सी एकदा त्याचा दोस्त ल्युकाचा घरी गेला होता. तिथे त्याची बहिण ॲन्टोनेला रोकुझो आली. पण मेस्सी तेव्हा एवढा लाजाळू होता की तो तिच्याशी बोललाही नाही. पण त्याला ती तेव्हाच आवडली होती आणि मोठेपणी हीच आपली गर्लफ्रेंड होणार, हे त्याने तेव्हाच ठरवूनही टाकले होते. त्यानंतर रोकुझाची भेट व्हावी म्हणून तो वारंवर ल्युकाच्या घरी जायला लागला.
6 / 7
६. जेव्हा ते दोघे १३- १४ वर्षांचे होते तेव्हा वडिलांची दुसऱ्या गावी बदली झाल्याने मेस्सीला ते शहर सोडून जावे लागले. तेव्हा दोघांच्या मैत्रीत थोडा खंड पडला.
7 / 7
७. त्यानंतर ४ ते ५ वर्षांनी २००५ साली ते पुन्हा भेटले आणि त्यांनी एकमेकांकडे आपले प्रेम व्यक्त केले. २००९ पर्यंत त्यांनी त्यांचे नाते जगासमाेर उघड केले नव्हते. त्यानंतर ते जवळपास ८ वर्षे लिव्ह इन मध्ये राहिले आणि २०१७ साली त्यांनी लग्न केले. त्यांना ३ मुले असून त्यापैकी २ लग्नापुर्वी झालेली आहेत.
टॅग्स : रिलेशनशिपफुटबॉललिओनेल मेस्सी