‘जन्माचा सोबती लाभला असता तर मी त्याच्यासाठी.. ’ रेखा सांगते मनासारखा जोडीदार आणि कुटुंब मिळालं असतं तर..
Updated:October 10, 2023 14:07 IST2023-10-10T14:01:23+5:302023-10-10T14:07:17+5:30

रेखा.... बस्स नाम ही काफी है... असं काहीसं हे व्यक्तिमत्त्व. १० ऑक्टोबर हा त्यांचा वाढदिवस. तिचा अभिनय, तिचं सौंदर्य, तिचा चार्म आणि ग्लॅमर याबाबत नव्याने काही सांगण्याची अजिबातच गरज नाही. तिच्या या सगळ्या गोष्टी जशा सगळ्यांना माहिती आहेत, तसंच तिच्या लव्ह लाईफबाबतही नेहमीच रंगवून चर्चा केली जाते.
तिला चाहत्यांचं प्रेम भरभरून मिळालं आणि अजूनही मिळतंय.. पण मोठ्या पडद्यावर प्रेमाची दुनिया भरभरून जगलेली ही अभिनेत्री खऱ्याखुऱ्या आयुष्यात मात्र जोडीदाराच्या प्रेमापासून वंचितच राहिली.
१९९० साली रेखा यांनी उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं. पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच मुकेश यांनी आत्महत्या केली आणि स्वत:च आयुष्य संपवून टाकलं. त्यांच्या आत्महत्येबाबतही अनेक उलट- सुलट चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर पुढे कित्येक वर्ष रेखा यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.
पण त्यानंतर १९९६ साली त्या एकदा एका मुलाखतीत बोलताना गंमतीने म्हणाल्या होत्या की मला माझ्या चाहत्यांसोबत स्विकार करणारा एखादा योग्य व्यक्ती मिळाला तर नक्कीच मी पुन्हा लग्न करण्याचा विचार करू शकते..
त्याच मुलाखतीत त्यांनी असंही सांगितलं होतं की जर त्यांना हवा तसा जोडीदार त्यांना मिळाला असता तर मी माझं सगळं लक्ष फक्त त्याच्यावरच केंद्रित केलं असतं. त्याचे कपडे, त्याचं खाणं- पिणं असं सगळं मीच ठरवलं असतं. एवढंच नाही तर स्वत:च्या हाताने जेवण तयार करून त्याला वाढलं असतं...
जोडीदाराबाबत एवढ्या हळव्या आणि एवढ्या स्वप्नाळू असलेल्या रेखा मात्र मुलांच्या बाबतीत म्हणतात की त्या मुलांसाठी खूप आग्रही आणि उत्सूक कधीच नव्हत्या. त्या म्हणतात की मला जर मुल असतं तर मी माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींवर कधीच लक्ष केंद्रित करू शकले नसते.
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तर नेहमीच बोललं जातं. पण रेखा आणि अभिनेते विनोद मेहरा यांनी त्या काळी लग्न केलं होतं, अशा अनेक अफवाही उठल्या होत्या. त्यानंतर रेखाचं नाव अभिनेते किरण कुमार आणि नविन निश्चल यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं.