लग्नानंतर मुुलींचे वजन झपाट्यानं वाढण्याची ६ कारणं, चवळीची शेंग असलेली स्लिम मुलगीही होते जाडजूड...

Published:October 21, 2024 07:07 PM2024-10-21T19:07:34+5:302024-10-21T19:42:24+5:30

Why Do Women Gain Weight After Marriage Know The 6 Reasons Behind It Here : Reasons Why Women Gain Weight After Marriage : Why Women Gain Weight After Marriage : Why Do Women Get Fat After Marriage :लग्नानंतर मुलींचे वजन का वाढत ? यामागची नेमकी कारण कोणती ते पाहूयात.

लग्नानंतर मुुलींचे वजन झपाट्यानं वाढण्याची ६ कारणं, चवळीची शेंग असलेली स्लिम मुलगीही होते जाडजूड...

लग्न झालेल्या महिलांना वाढत्या वजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. लग्नांनंतर अनेकदा महिलांचे वजन वाढले की त्यांना 'लग्न मानवले' अशा अर्थाचे टोमणे देखील ऐकवले जातात. खरंतर लग्नानंतर स्त्रियांच्या वजनात वाढ होणे ही अगदी कॉमन गोष्ट आहे. लग्नानंतर वजन वाढण्याची अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात, परंतु यामध्ये शारीरिक, भावनिक आणि लाईफस्टाइल मधील बदल अशा वेगवेगळ्या कारणांचा विशेष समावेश असतो. लग्नानंतर वजन वाढण्याची मुख्य कारणं नेमकी कोणती ते पाहूयात.

लग्नानंतर मुुलींचे वजन झपाट्यानं वाढण्याची ६ कारणं, चवळीची शेंग असलेली स्लिम मुलगीही होते जाडजूड...

लग्नानंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात. लग्नानंतर येणाऱ्या प्रेग्नन्सीमुळे महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल चेंजेस होतात. शरीरातील हार्मोन्सची पातळी वर - खाली होते यामुळे होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांचे वजन वाढते. शक्यतो, हार्मोन्समधील बदलांमुळे चयापचय आणि पचनक्रियेवरही परिणाम होतो, त्यामुळे वजन वाढू शकते.

लग्नानंतर मुुलींचे वजन झपाट्यानं वाढण्याची ६ कारणं, चवळीची शेंग असलेली स्लिम मुलगीही होते जाडजूड...

लग्नानंतर महिलांवर अनेक नवीन जबाबदाऱ्या येतात. घरातील कामे, नातेसंबंधातील चढ-उतार, करिअरच्या चिंता इत्यादी गोष्टी एकदम अचानकपणे त्यांच्या खांद्यावर येतात. यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. सतत येणाऱ्या स्ट्रेसमुळे खाण्याच्या पद्धतीही बदलतात, त्यामुळे वजन वाढू शकते.

लग्नानंतर मुुलींचे वजन झपाट्यानं वाढण्याची ६ कारणं, चवळीची शेंग असलेली स्लिम मुलगीही होते जाडजूड...

लग्नाआधी स्त्रिया परफेक्ट फिगर किंवा व्यवस्थित शेपमध्ये राहण्यासाठी भरपूर डाएटिंग आणि एक्सरसाइज करतात. पण लग्नानंतर अनेक जबाबदाऱ्या आल्यामुळे काहीवेळा त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसतो. याचबरोबर काहीवेळा स्त्रिया लग्न झाल्यानंतर फिगर किंवा शेपमध्ये राहण्याच्या गोष्टीकडे तितकेसे लक्ष देत नाहीत, त्यामुळे मेहनतीने कमी केलेले वजन वाढते.

लग्नानंतर मुुलींचे वजन झपाट्यानं वाढण्याची ६ कारणं, चवळीची शेंग असलेली स्लिम मुलगीही होते जाडजूड...

लग्नानंतर महिलांना सासरच्या घरातील खाण्यापिण्याच्या सवयी कमी अधिक प्रमाणात फॉलो कराव्या लागतात. यामुळे महिलांच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही परिणाम होतो. माहेरी इतकी वर्ष खाण्यापिण्याच्या फॉलो केलेल्या सवयीत अचानकपणे बदल होतो. हे देखील लग्नानंतर महिलांच्या वजनवाढीचे मुख्य कारण असू शकते. अशा परिस्थितीत, सासरी जर खूपच तेलकट - तूपकट पदार्थ वारंवार खाल्ले जात असतील तरीही वजन वाढू शकते.

लग्नानंतर मुुलींचे वजन झपाट्यानं वाढण्याची ६ कारणं, चवळीची शेंग असलेली स्लिम मुलगीही होते जाडजूड...

लग्नानंतर महिलांना घरकाम, ऑफिस अशा नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागावं लागतं आणि सकाळी देखील लवकर उठावं लागतं. अशा प्रकारे झोपेच्या कमतरतेमुळे स्ट्रेस हार्मोन्सही वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि सारखी भूक लागण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते.

लग्नानंतर मुुलींचे वजन झपाट्यानं वाढण्याची ६ कारणं, चवळीची शेंग असलेली स्लिम मुलगीही होते जाडजूड...

लग्नानंतर स्त्रीला नवरा - बायको या नात्यात अधिक सुरक्षितता वाटते. या नवीन नात्यामुळे आपली कुणीतरी हक्काची व्यक्ती सोबत आहे यामुळे देखील त्या स्त्रीचा ताण कमी होतो. यामुळे ती अधिक आनंदी आणि समाधानी होते. लग्नानंतर वजन वाढण्यामागे हे देखील एक कारण असू शकते.