Sexual Health Tips : सेक्स हार्मोन्सच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये उद्भवतात 'या' समस्या; हॅप्पी सेक्स लाईफसाठी लक्षणं जाणून घ्या Published:October 22, 2021 06:31 PM 2021-10-22T18:31:28+5:30 2021-10-22T19:08:06+5:30
Sexual Health Tips : टेस्टोस्टेरॉन हार्मोनला सेक्स हार्मोन म्हणतात, ते पुरुषांच्या शरीरात तयार होते. या संप्रेरकामुळे पुरुषांमध्ये सेक्स ड्राइव्हची वाढ आणि कमतरता उद्भवते. कोणत्याही जोडप्यांचं नातं घट्ट होण्यासाठी सुखी लैगिंक जीवन असणंही तितकंच महत्वाचं असतं. सेक्स हार्मोन्सची कमतरता पुरुषांवर कसा परिणाम करते हे तुम्हाला माहिती आहे का? पुरुषांमध्ये सेक्स हार्मोन्सच्या कमतरतेमुळे दिसणारी लक्षणं अनेकदा समजून येत नाही. जसजसं पुरुषांचे वय वाढते पुरुषांमधील सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत पुरुषांमध्ये अशी काही लक्षणे दिसू लागतात.
टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हार्मोनला सेक्स हार्मोन (Male sex hormone) म्हणतात. ते पुरुषांच्या शरीरात तयार होते. या संप्रेरकामुळे पुरुषांमध्ये सेक्स ड्राइव्हची वाढ आणि कमतरता उद्भवते. अशा परिस्थितीत जेव्हा पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनमध्ये घट होते, तेव्हा त्याचा शरीरावरही परिणाम होऊ लागतो. परिणामी पुरुषांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
सतत मूड बदलणं
जेव्हा पुरुषांच्या शरीरात सेक्स हार्मोन्सची कमतरता असते, तेव्हा त्यांचा मूड पुन्हा पुन्हा बदलू लागतो. या सेक्स हार्मोनच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये भावनिक बदल होऊ लागतात. मूड बदलणे देखील एक भावनिक बदल आहे. जेव्हा हा सेक्स हार्मोन पुरुषांच्या शरीरातून कमी होऊ लागतो, तेव्हा त्याचा पुरुषांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्याच्या कमतरतेमुळे, माणूस चिडचिडा होतो, तणावपूर्ण आणि नेहमी अस्वस्थ राहतो. परंतु जर पुरुषाचे टेस्टोस्टेरॉन हार्मोन व्यवस्थित असेल तर मूड चांगला राहतो.
थकवा येणं
जेव्हा पुरुषांना त्यांच्या शरीरात उर्जा जाणवत नाही, तेव्हा टेस्टोस्टेरॉनची कमतरता देखील असू शकते. अशा परिस्थितीत स्नायूंवर मोठा परिणाम होतो. टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या कमतरतेमुळे पुरुषांना स्नायूंमध्ये ताकद जाणवत नाही. जे पुरुष सामान्यांपेक्षा व्यवस्थित, उत्साही दिसतात टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यावर ते तितके बळकट वाटत नाहीत. अशा परिस्थितीत स्नायू कमकुवत होऊ लागतात.
लैगिंक इच्छा कमी होणं
जेव्हा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता असते तेव्हा त्यांना सेक्स करण्याची इच्छा नसते. या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे पुरुष लैंगिक संबंधातून माघार घेऊ लागतात. यामुळे त्यांच्या नात्यावर खूप वाईट परिणाम होतो. लैंगिक इच्छेच्या अभावी, पुरुष संबंध ठेवण्यास उत्तेजित होऊ शकत नाही.
ताण तणाव
टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे पुरुष जास्त ताण घेऊ लागतात. तणाव घेतल्याने लैंगिक इच्छा देखील कमी होते आणि अशी व्यक्ती चांगले संबंध ठेवण्यास सक्षम नसते. यामुळे शुक्राणूंची संख्या देखील कमी होते आणि त्याचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो.
स्मरणशक्ती कमी होणं
जेव्हा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची कमतरता असते, तेव्हा त्यांच्या स्मरणशक्तीवरही वाईट परिणाम होतो. पुरुषांची स्मरणशक्तीही कमी होऊ लागते. जसजसे वय वाढते तसतसे बहुतेक पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होते आणि यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो.