Shraddha Walker Murder Case : श्रद्धासारखी वेळ येऊ देऊ नका; लोक काय म्हणतील...', एक्सपर्ट्सचा महत्वाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 6:54 PM 1 / 11महाराष्ट्रातील रहिवासी असलेली श्रद्धा वालकर (Shraddha Walker) आपला बॉयफ्रेंड आफताब अमीन पूनावालासह (Aftab Ameen Poonawala) दिल्लीत लिव्हइनमध्ये राहत होती. १८ मे ला या दोघांमध्ये भांडण झालं आणि आफताबनं श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि ते ठेवण्यासाठी फ्रिज विकत घेतला. १८ दिवस रात्री उशिरा अफताब रात्री उशीरा घराबाहेर पडायचा आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये श्रद्धाच्या शवाचे तुकडे फेकत होता. 2 / 11 या घटनेनंतर टॉक्सिक रिलेशनबाबत चर्चा होत आहे. फक्त श्रद्धाच नाही अशा अनेक मुली टॉक्सिक रिलेशनमध्ये अडकल्यानं मानसिक तणावाखाली आहेत. (Experts advice on shraddha murder case and domestic violence in relationship)3 / 11रिलेशनशिपमध्ये असल्यावर काही चुकीच्या गोष्टी जाणवल्यास त्वरीत अशा रिलेशनशीपमधून बाहेर पडायला हवं. अन्यथा तुमच्यासोबत काहीही चुकीचं घडण्याची शक्यता असते. रिलेशनशीप एक्सपर्ट गीतांजली शर्मा यांनी एनबीटी या हिंदी पोर्टलशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 4 / 11गितांजली सांगतात, जर तुमचा पार्टनर तुमच्यात इंटरेस्ट दाखवत नसेल. तुम्हाला भेटण्याची त्याची इच्छा नसेल. तुमचे कॉल्स, मेसेजेस इग्नोर केले जात असतील तर काहीतरी चुकीचं घडत असल्याचं समजून घ्या. अशावेळी तुमचा पार्टनर न भेटण्याचे कारणं शोधेल. त्यावेळी तुम्हाला कळायला हवं की आता वेगळं होण्याची वेळ आली आहे.5 / 11जर तुमचा जोडीदार तुमच्याशी शारीरिक किंवा मानसिकरित्या कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करत असेल तर तुम्ही देखील सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्ही हेही लक्षात ठेवावे की तुमच्या जोडीदाराला कोणत्याही प्रकारचा विकार नाही, ज्यामुळे तो तुमच्याशी विचित्र वागतो किंवा सतत दोष शोधत राहतो.6 / 11या सर्व गोष्टींचा तुमच्या नात्यावरही परिणाम होतो. हे लक्षात ठेवा की जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर एकमेकांवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे आणि कोणताही निर्णय दोघांच्या संमतीने घ्यावा. जर तुमच्या नात्यात असे झाले नाही तर धोक्याची घंटा वाजली आहे. अशा स्थितीत, आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार केला पाहिजे.7 / 11तज्ज्ञांच्या मते, सर्व मुलींना कधीकधी असे वाटते की माझा जोडीदार नाराज आहे किंवा आमचे नाते सध्या चांगले नाही. असे असूनही चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या अशा नात्यात अधिकाधिक अडकत जातात. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. इशिता मुखर्जी म्हणतात, 'तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवत नाहीयेना याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. 8 / 11या गोष्टींशिवाय तुमचे इंटमसीही चांगली नसेल आणि जर तुम्ही एकमेकांशी बोलणे कमी केले तर याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही काही अडचणीत असाल आणि तुमचा पार्टनर तुम्हाला साथ देत नसेल, तर तो फक्त त्याच्या मजेसाठी तुमच्यासोबत असेल, तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल.9 / 11बहुतेक रिलेशनशिपमध्ये असे दिसून येते की जर तुमचा पार्टनर दुसऱ्या अफेअरमुळे तुमची फसवणूक करत असेल आणि तुम्हाला कळूनही तुम्ही त्याला माफ करत असाल तर तुम्हाला समजले पाहिजे की पुढे गोष्टी हाताळणे सोपे नाही.10 / 11आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आपण स्वतःला पटवून दिले पाहिजे की आपण एका चांगल्या जोडीदारास पात्र आहोत. आपण सहन करत राहीलो तर उद्या मोठं संकटही ओढावू शकतं. नात्यात राहून त्रास करून घेण्यापेक्षा एकटं राहून आयुष्य चांगलं जगा.11 / 11ब्रेकअप झाल्यावर, आपल्याला आपल्या भविष्याची सर्वात जास्त भीती वाटते की मग आपले काय होईल. आपण लोकांचा विचार करतो, की लोक आपल्याबद्दल काय विचार करतील. पण आपल्या भविष्याचा विचार करून आपण आपला वर्तमान वाया घालवत नाही आहोत हे आपण खरोखरच पाहिले पाहिजे. आणखी वाचा Subscribe to Notifications