सरोगसी स्टार किड्स; सरोगसीने आईबाबा झाले हे स्टार्स! शाहरुख खान ते सनी लिओनी, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 6:04 PM 1 / 9 मूल जन्माला घालण्यासाठी सरोगसी दोन पद्धतींनी वापरले जाते. पहिली म्हणजे पारंपरिक सरोगसी. यामध्ये सरोगेट माता म्हणून गर्भाशयाचे दान देत असलेल्या स्त्रीचे बीज वापरले जाते. म्हणजेच मुलाचे व जन्म देत असलेल्या मातेचे आनुवंशिक नाते असते. मात्र, सध्या या पद्धतीपेक्षा गेस्टेशनल पद्धतीचा वापर अधिक केला जातो. 2 / 9या पद्धतीत सरोगेट मातेचे स्त्री बीज न वापरता आई बनू इच्छिणाºया स्त्रीचे बीज वापरले जाते. हे स्त्री बीज आणि तिच्या जोडीदाराचे शुक्राणू वापरून गर्भ विकसित केला जातो. अशा प्रकारे आई-वडील बनू इच्छित असलेल्या दाम्पत्याचा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भात वाढवला जातो. आज आम्ही तुम्ही सरोगरीनं आई वडील बनलेल्या बॉलिवूड कपल्सबद्दल सांगणार आहोत. 3 / 9टीव्ही क्वीन एकता कपूर वयाच्या ४४ व्या वर्षी आई झाली. 2019 मध्ये, एकताने सरोगसीद्वारे तिच्या घरी एका लहान पाहुण्याचे स्वागत केले. त्याने आपल्या मुलाचे नाव रवी ठेवले आहे, जे तिच्या वडिलांचे खरे नाव आहे.4 / 9कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान वयाच्या 43 व्या वर्षी तीन मुलांची आई झाली. 2008 मध्ये फराहने IVF च्या माध्यमातून तिघांना एकत्र जन्म दिला. फराहने 2004 मध्ये शिरीष कुंदरशी लग्न केले. 5 / 9शाहरुख खानची पत्नी गौरी खानचे नाव 40 वर्षांनंतर आई बनणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये सामील आहे. शाहरुखचा तिसरा मुलगा अबरामचा जन्म सरोगसीद्वारे झाला तेव्हा गौरी 42 वर्षांची होती. त्यावेळी याबाबत बरीच चर्चा झाली होती.6 / 9सनी लिओनी सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांची आई बनली. सरोगसीच्या माध्यमातून ती दोन जुळ्या मुलांची आई झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. 7 / 9करण जोहर वयाच्या ४४ व्या वर्षी सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांचा सिंगल फादर बनला. या मुलांमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्याच्या मुलाचे नाव यश आणि मुलीचे नाव रुही. करणच्या वडिलांचे नाव यश जोहर होते. त्यांनी आपल्या मुलाचे नाव वडिलांचे असल्याचे बोलले जात आहे. या मुलांचा जन्म फेब्रुवारीमध्ये झाला होता8 / 9आमिर खानचा मुलगा आझाद राव खानचा जन्म सरोगसीद्वारे झाला. आमिर खान आणि किरण राव यांनी 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने या मुलाला जन्म दिला. किरणला गर्भधारणा होण्यात अडचणी येत असल्याने सरोगसीचा निर्णय घेण्यात आला.9 / 9शिल्पा शेट्टीची मुलगी समिषाचा जन्मही सरोगसीद्वारे झाला आहे. ४५ वर्षांच्या शिल्पाने अनेक गर्भपातानंतर ठरवले होते की ती तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी सरोगसीचा अवलंब करेल. आणखी वाचा Subscribe to Notifications