तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट...

Published:February 14, 2024 03:23 PM2024-02-14T15:23:05+5:302024-02-14T16:17:07+5:30

तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट...

बाॅलीवूडमधली नाती म्हणजे काचेपेक्षाही नाजूक.... असं नेहमीच म्हटलं जातं. पण त्याच बॉलीवूडमधल्या काही नात्यांची दोर मात्र एकदम मजबूत आहे. तु ही तो जन्नत मेरी... असं म्हणत त्यांचा सुरू झालेला प्रवास दर दिवशी नव्याने बहरत आहे...

तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट...

यातलं एक जोडपं म्हणजे माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने. डॉ. नेनेंचा बॉलीवूडशी काहीही संबंध नाही. पण त्यांनी माधुरीचं काम, तिचे व्याप समजून घेत तिला नेहमीच साथ दिली.

तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट...

जेनेलिया डिसुझा आणि रितेश देशमुख हे एक गोड जोडपं. दोन भिन्न संस्कृतीतले दोघे जण. पण दोघांनीही एकमेकांसकट त्यांच्या संस्कृतीला, चालीरितींना समजून घेतलं.

तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट...

शाहरुख खान आणि गौरी यांच्याबद्दल काय सांगणार.. आजही शाहरुख गौरीसाठी तेवढाच हळवा आहे जेवढा तो २५ वर्षांपुर्वी होता. गौरीही शाहरुखच्या कामात अजिबात ढवळाढवळ न करता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्यांची जोडी आज बॉलीवूडमधल्या अनेकांसाठी आदर्श आहे.

तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट...

रणबीर कपूर आणि आलिया भट हे दोघेही अतिशय परिपक्व वाटतात. म्हणूनच तर लेकीच्या संगोपनासाठी ब्रेक घेऊन घरी राहणं आणि आलियाला कामासाठी बाहेर पडू देणं रणबीर सहजपणे करू शकतो.

तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट...

ट्विंकल खन्ना आणि अक्षयकुमार यांचं नातंही अगदी वेगळं. लग्नानंतर ट्विंकल बॉलीवूडपासून दूर झाली आणि तिचं स्वत:चं विश्व तयार केलं. वयाच्या पन्नाशीत ती परदेशात जाऊन मास्टर्स डिग्री घेऊन आली. दोघांचंही करिअर अगदी वेगळ्या मार्गाने एकमेकांमध्ये लूडबूड न करता पण एकमेकांच्या साथीने धाव घेत आहे. एकमेकांच्या कामाचा सन्मान करणं ही त्यांच्या नात्याची खुबी आहे.

तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट...

काजोल आणि अजय देवगण ही देखील एक लोकप्रिय जोडी. अजय अतिशय शांत, संयमी, विचारी तर काजोल तेवढीच अवखळ, बडबडी.. पण दोघांनी एकमेकांची लय बरोबर सांभाळली आहे.

तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या जोडीचीही गोष्टच न्यारी. मुलीच्या जन्मानंतर अनुष्काने करिअरमधून ब्रेक घेतला. म्हणूनच तर विराट १०० टक्के फोकस त्याच्या कामावर करू शकला. अनुष्काच्या या निर्णयाचा त्यानेही नेहमीच आदर केला आहे.

तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट...

करिना कपूर आणि सैफ अली खान हे देखील एक शानदार जोडपं. सैफच्या तुलनेत करिना अधिक यशस्वी.. पण सैफने या गोष्टीला कधीही इगो इश्यू केलं नाही. उलट प्रत्येकवेळी त्याची करिनाला साथच असते.