तू ही तो जन्नत मेरी! पाहा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले एव्हरग्रीन कपल्स - नात्याची व्हॅलेंटाईन स्पेशल गोष्ट... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 3:23 PM 1 / 9बाॅलीवूडमधली नाती म्हणजे काचेपेक्षाही नाजूक.... असं नेहमीच म्हटलं जातं. पण त्याच बॉलीवूडमधल्या काही नात्यांची दोर मात्र एकदम मजबूत आहे. तु ही तो जन्नत मेरी... असं म्हणत त्यांचा सुरू झालेला प्रवास दर दिवशी नव्याने बहरत आहे...2 / 9यातलं एक जोडपं म्हणजे माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने. डॉ. नेनेंचा बॉलीवूडशी काहीही संबंध नाही. पण त्यांनी माधुरीचं काम, तिचे व्याप समजून घेत तिला नेहमीच साथ दिली. 3 / 9जेनेलिया डिसुझा आणि रितेश देशमुख हे एक गोड जोडपं. दोन भिन्न संस्कृतीतले दोघे जण. पण दोघांनीही एकमेकांसकट त्यांच्या संस्कृतीला, चालीरितींना समजून घेतलं.4 / 9शाहरुख खान आणि गौरी यांच्याबद्दल काय सांगणार.. आजही शाहरुख गौरीसाठी तेवढाच हळवा आहे जेवढा तो २५ वर्षांपुर्वी होता. गौरीही शाहरुखच्या कामात अजिबात ढवळाढवळ न करता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्यांची जोडी आज बॉलीवूडमधल्या अनेकांसाठी आदर्श आहे. 5 / 9रणबीर कपूर आणि आलिया भट हे दोघेही अतिशय परिपक्व वाटतात. म्हणूनच तर लेकीच्या संगोपनासाठी ब्रेक घेऊन घरी राहणं आणि आलियाला कामासाठी बाहेर पडू देणं रणबीर सहजपणे करू शकतो. 6 / 9ट्विंकल खन्ना आणि अक्षयकुमार यांचं नातंही अगदी वेगळं. लग्नानंतर ट्विंकल बॉलीवूडपासून दूर झाली आणि तिचं स्वत:चं विश्व तयार केलं. वयाच्या पन्नाशीत ती परदेशात जाऊन मास्टर्स डिग्री घेऊन आली. दोघांचंही करिअर अगदी वेगळ्या मार्गाने एकमेकांमध्ये लूडबूड न करता पण एकमेकांच्या साथीने धाव घेत आहे. एकमेकांच्या कामाचा सन्मान करणं ही त्यांच्या नात्याची खुबी आहे. 7 / 9काजोल आणि अजय देवगण ही देखील एक लोकप्रिय जोडी. अजय अतिशय शांत, संयमी, विचारी तर काजोल तेवढीच अवखळ, बडबडी.. पण दोघांनी एकमेकांची लय बरोबर सांभाळली आहे. 8 / 9अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या जोडीचीही गोष्टच न्यारी. मुलीच्या जन्मानंतर अनुष्काने करिअरमधून ब्रेक घेतला. म्हणूनच तर विराट १०० टक्के फोकस त्याच्या कामावर करू शकला. अनुष्काच्या या निर्णयाचा त्यानेही नेहमीच आदर केला आहे. 9 / 9करिना कपूर आणि सैफ अली खान हे देखील एक शानदार जोडपं. सैफच्या तुलनेत करिना अधिक यशस्वी.. पण सैफने या गोष्टीला कधीही इगो इश्यू केलं नाही. उलट प्रत्येकवेळी त्याची करिनाला साथच असते. आणखी वाचा Subscribe to Notifications