लग्न करताना मुलापेक्षा मुलीचं वय कमी असणं खरंच गरजेचं असतं का? योग्य अंतर कोणतं? Published:August 30, 2024 01:59 PM 2024-08-30T13:59:03+5:30 2024-08-30T15:16:29+5:30
Why Is There a Difference Of 5 to 7 Years Between Husband And Wife : बायकोचे वय नवऱ्यापेक्षा कमी असावे असा एक पुर्वांपार समज आहे, लग्न ठरवताना आजही तो निकष पाहिला जातो. पण वयात जास्त किंवा कमी अंतर ही काही वैवाहिक सुखासाठी एकमेव महत्त्वाची गोष्ट नाही. लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. लोक लग्नाचा सोहळा खूप खर्च करून मोठ्या उत्साहात साजरा करतात. अरेंज मॅरेज करताना तर मुलगा मुलीचं वय विचारात घेतलं जातं. मुलीपेक्षा मुलाचे वय जास्त असावे हे असा एक प्रचलित रिवाज आहे. (What Is The Best Age Difference For A Successful Marriage)
मुली लवकर वयात येतात, मुलांपेक्षा त्यांची भावनिक समज जास्त चांगली असते, मुलं उशीरा वयात येतात त्यामुळेही मुलापेक्षा मुलीचं वय कमी असावं असं पूर्वी मानलं जात असे. आजही अरेंज मॅरेजमध्ये वधू लहान हवी हे गृहितक आहेच.
नवऱ्याचा अधिकार मोठा, वय मोठं त्यामुळे पत्नीनं पतीचा आदर करावा असा एक समज पूर्वी होता. आजही अपेक्षा तीच असते. मात्र वयातलं अंतर हे काही परस्पर आदर, प्रेम, सामंजस्य यासाठी पुरेसं नसतं. त्यासाठी नात्यात दोघांना परस्परांचा आदर करावा लागतो, तो करणं आवश्यक आहे.
महिलांच्या रजोवृत्तीच्या वय विचारात घेऊन पत्नी पतीपेक्षा लहान असावी असे पूर्वी मानले जात होते. मात्र आज आपण अनेक जोडपी पाहतो ज्यात पत्नीचे वय पतीपेक्षा जास्त आहे आणि त्यांचा संसार उत्तम सुरु आहे.
पतीपत्नीचं नातं परस्पर प्रेम, सामंजस्य, आदर, कुटूंबात एकमेकांना दिलेला सन्मान, आर्थिक भावनिक आधार आणि मुलांची देखभाल यावर फुलते बहरते. ठरवून लग्न करताना पती-पत्नीच्या वयात कमी अंतर असणं गरजेचं मानलं जातं. मात्र वयाबरोबर अन्य कम्पॅटिबिलीचाही विचार विवाह करताना करायला हवा.
वृद्धावस्थेत एकमेकांच्या आधाराची गरज असते. जीवनाच्या या स्थितीत पत्नीचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. वृद्ध दाम्पत्य एकमेकांसाठी आधार बनू शकतात.
एकमेकांना सुखदु:खात साथ, मुलांचं उत्तम पालनपोषण, दोघांनी एकमेकांचा सन्मान करणं आणि नात्यात समतोल असणं ही वैवाहिक सुखासाठी महत्त्वाची गोष्ट आहे.