World Aids Day : कॅज्युअल सेक्समुळे HIV सह लैंगिक आजारांचा धोका, ५ गंभीर परिणामांचा विचार करा.. By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 12:24 AM 1 / 10१ डिसेंबर. जागतिक एड्स दिन (World Aids Day) साजरा केला जातो.आजही जगभरात एकूण ३. ५३ कोटी लोक एचआयव्हीसह जगत आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे. सुरक्षित लैंगिक संबंध नसतील तर एचआयव्ही संक्रमणाचा धोका वाढतो. हल्ली विवाहाआधीच संबंध ठेवण्याचं प्रमाण वाढतं आहे, बरेच तरुण मुलंमुली सेक्शुअल एक्सपिरीमेण्टेशन करण्याच्या नादात आपलं आरोग्यही धोक्यात घालतात. कॅज्युअल सेक्सच्या नावाखाली ही जोखीम परवडणारी नाही याचं भान ठेवायला हवं.2 / 10कोणत्याही प्रकारची भावनीक ओढ, प्रेम किंवा कमिटमेण्ट नसताना ठेवलेले शारीरिक संबंध. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारत ही आशियातील ऑनलाइन डेटिंग ॲपसाठीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. गेल्या पाच वर्षांत विविध ठिकाणी केलेल्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, तरुणींचाही कॅज्युअल सेक्सकडे ओढा वाढला आहे.त्यातले धोके समजून घेतले जात नाही.3 / 10मानसशास्त्रज्ञ श्रुती शाह सांगतात, स्त्रियांनी सेक्सचा आनंद घेणं याबद्दल अनेकदा सकारात्मक बोलले जात नाही. मात्र काहीजणी कॅज्यूअल सेक्स केल्यानंतर मानसिक दबावात किंवा गिल्टमध्ये गुरफटून जातात. त्यामुळे कॅज्यूअल सेक्स करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.4 / 10तुम्ही मित्राच्या पार्टीत असाल किंवा तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आली असेल, तुम्हाला प्रत्येक वेळी सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागते. आकडेवारी दर्शवते की असुरक्षित लैंगिक संबंध हे एचआयव्ही, एड्स आणि विविध प्रकारच्या लैंगिक संक्रमणाचे कारण आहे. सेक्स जरी कधीतरी केला तरीही सुरक्षित सेक्सला प्राधान्य द्या. तुमच्या जोडीदाराला संकोच न करता कंडोम वापरण्यास सांगा. जर त्यांनी तसे केले नाही तर तुम्ही तिथेच थांबावे.5 / 10जरी तुम्ही एखाद्यासोबत कॅज्युअल सेक्स करत असाल तर ते कोणाशीही शेअर करू नका. हा तुमच्या आयुष्याचा असा निर्णय आहे, जो तुम्ही प्रत्येकाला वैयक्तिकरित्या सांगू शकत नाही. अशा संभोगानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.6 / 10जर तुम्ही कॅज्यूअल लैंगिक संबंध ठेवत असाल तर अनेकजणी स्वत:विषयीचा आदर विसरतात, गिल्टमध्ये जगतात. आपल्याला आपण करतो ते खरंच हवं आहे का, हे पहायला हवं.7 / 10वन नाईट स्टँड, हुकअप, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स आणि बरेच काही चर्चेत असते, पण त्याचा आपल्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो, हे समजून घ्या.8 / 10 अमेरिकन सोशियोलॉजिकल रिव्ह्यूमध्ये प्रकाशित झालेल्या 2012 च्या अभ्यासानुसार, केवळ 11 टक्के महिलांनी नवीन जोडीदारासोबत कॅज्यूल सेक्स करताना कामोत्तेजना झाल्याची नोंद केली आहे. कॅज्यूअल सेक्स क्लिष्ट आहे. म्हणून पहिल्याचवेळी ऑर्गेज़्म प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नका, परंतु सेक्सचा आनंद घ्या.9 / 10कॅज्युअल सेक्स नंतर, गोष्टी सुरुवातीला होत्या तितक्या साध्या नसतात. सेक्स नंतर तुम्हाला एक संबंध जाणवू शकतो. लोक याला वन नाईट स्टँड, हुकअप, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स आणि बरेच काही म्हणतात. 10 / 10पण योग्य वेळी यातून बाहेर न आल्यास त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावरही होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications