1 gram gold bracelet designs, latest fashion bracelet designs
दिवाळीत १ ग्रॅम सोन्याचं ब्रेसलेट घ्यायचं? बघा हाताचं सौंदर्य खुलविणारे ८ लेटेस्ट फॅशनचे डिझाईन्स..Published:October 27, 2024 09:09 AM2024-10-27T09:09:02+5:302024-10-27T09:10:01+5:30Join usJoin usNext सोनं खूपच महागलं आहे. त्यामुळे दिवाळीत सोन्याचा एखादा दागिना घेणं सर्वसामान्यांना परवडणारं नाही. म्हणूनच यंदाच्या दिवाळीत अस्सल सोन्याऐवजी १ ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट घेण्याचा विचार करत असाल तर हे काही पर्याय तुम्हाला आवडू शकतात. हे एक सुंदर, नाजुक डिझाईन पाहा. कोणत्याही वयोगटातल्या महिलेच्या हातावर ते नक्कीच खुलून दिसेल. बारीक स्टोन लावलेलं हे डिझाईन पाहताक्षणीच आवडणारं आहे. एखाद्या पार्टीमध्ये तुमच्या हातावर हे ब्रेसलेट असेल तर तुमचं व्यक्तिमत्त्व नक्कीच आणखी उठून दिसेल. मंगळसूत्र घालण्याऐवजी असं ब्रेसलेट हातात घालण्याची क्रेझ हल्ली खूप वाढत चालली आहे. त्यामुळे असं एखादं तुमच्या कलेक्शनमध्ये हवंच.. हल्ली रुद्राक्ष जडवून गळ्यातलं, अंगठी किंवा ब्रेसलेट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. तुम्हालाही ते आवडत असेल तर या डिझाईनचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. अगदी रोज वापरायला हे डिझाईन खूप छान आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींनाही ते खूप शोभून दिसेल. सणावाराला किंवा खूप ठराविक प्रसंगी घालण्यासाठीच ब्रेसलेट घेण्याचा विचार करत असाल तर हा एक पर्याय तुम्हाला आवडू शकतो. टॅग्स :खरेदीदिवाळी 2024दागिनेसोनंफॅशनShoppingDiwalijewelleryGoldfashion