नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला फक्त १००० रुपयांच्या बजेटमध्ये देता येतील असे १० गिफ्ट, न्यू इयर स्पेशल.. Published:December 21, 2022 12:16 PM 2022-12-21T12:16:44+5:30 2022-12-21T12:57:21+5:30
10 Fabulous Gifts for Husband or boyfriend on New Year & Unique Ways to Wish Him a Happy New Year : ख्रिसमससाठी तुमच्या आयुष्यातील पुरुषांना गिफ्ट देण्यासाठीचे एक से एक उत्तम पर्याय कोणते याबद्दल समजून घेऊयात. ख्रिसमस अवघ्या काही दिवसांवर आला आहे. ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देऊन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची प्रथा आहे. जगभरात कुठेही गेलात तरी ख्रिसमस हा सण भेटवस्तूंशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी काही भेटवस्तू घेण्याचा विचार करत असाल. भेटवस्तू देणे तसे सोपे काम नाही, विशेषत: जेव्हा ती पुरुषांसाठी निवडायची असते. तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील पुरुषांसाठी काही ना काही भेटवस्तू घ्यायची असेल पण काय घ्यावे हे समजत नसेल. पुरुषांसाठी कोणते गिफ्ट योग्य आहेत? त्यांना कोणते गिफ्ट आवडतील. ख्रिसमससाठी तुमच्या आयुष्यातील पुरुषांना गिफ्ट देण्यासाठीचे एक से एक उत्तम पर्याय कोणते याबद्दल समजून घेऊयात. (10 Fabulous Gifts for Husband or boyfriend on New Year & Unique Ways to Wish Him a Happy New Year).
जिम बॅग (Gym Bag)
तुम्ही ज्यांना गिफ्ट देऊ इच्छिता ती व्यक्ती जर नियमित जिमला जात असेल तर जिम बॅग गिफ्ट देणं हा उत्तम पर्याय आहे. जिममध्ये जाताना त्यांचं पाकीट, फोन, पाण्याची बाटली इतकं पुरेसं साहित्य मावेल अशी जिम बॅग द्यावी. ही जिम बॅग ५०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत मिळू शकते.
सनग्लासेस (Sunglasses)
ब्रँडेड व भारी किमतीचे सनग्लासेस घालणे हे पुरुषांमध्ये एक स्टाईल स्टेटमेंट असते. त्या व्यक्तीच्या आवडीनुसार व चेहेऱ्याला शोभेल असा एखादा छान सनग्लासेस तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. तुम्हाला ४०० ते १००० या प्राईज रेंजमध्ये सनग्लासेस मिळतील.
जॅकेट (Jacket)
स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाही आपल्या वॉर्डरोबमध्ये, स्टायलिश व ट्रेंडी कपडे असावे अशी इच्छा असते. पुरुषांच्या वॉर्डरोबमध्ये शर्ट्स, टीशर्ट सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स असतात. जर ते ट्रेंड फॉलो करत असतील तर त्यांच्या आवडीनुसार ट्रेंडी जॅकेट देऊ शकता. तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या जॅकेटची निवड करू शकता. ही छान भेटवस्तू त्यांना कूल लुक देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जॅकेट्स ८०० पासून ते पुढे तुम्हाला जितकं ब्रँडेड घ्यायची इच्छा असेल तितकं महाग घेऊ शकता.
हेडफोन्स (Headphones)
हेडफोन किंवा इअरफोन ही खूप उपयुक्त भेटवस्तू ठरू शकते. जर त्यांना गाणी ऐकण्याची आवड असेल तर उत्तम ब्रँडचे हेडफोन्स देऊ शकता. हेडफोन त्यांना फक्त गाणी ऐकण्यासाठीच नाही तर इतर कामासाठीसुद्धा फायदेशीर ठरू शकतो. आजकाल वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड वाढत असल्यामुळे, हेडफोन किंवा इअरफोन हे एक उपयुक्त उपकरणे बनले आहेत. चांगल्या दर्जाच्या हेडफोन्सची किंमत १००० रुपयांपासून सुरु आहे.
लॅपटॉप बॅग (Laptop bag)
आजच्या फास्ट युगात आपण प्रत्येकवेळी आपल्यासोबत लॅपटॉप कॅरी करत असतो. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना लॅपटॉप व्यवस्थित ठेवणारी लॅपटॉप बॅग भेट देऊ शकता. या बॅगेत लॅपटॉप व्यतिरिक्त टॅब, मोबाईल, नोटबुक, पुस्तक अश्या अनेक वस्तू राहू शकतात. लॅपटॉप बॅग ५०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत मिळू शकते.
पोर्टेबल चार्जेर (Portable Charger)
आजकाल जवळपास प्रत्येकाकडेच स्मार्टफोन असतो. फोन हा आयुष्याचा भाग बनला आहे, बहुतेक महत्त्वाची कामे आता फोनवरच केली जातात, अशा परिस्थितीत त्याची बॅटरी चार्ज करणे आवश्यक असते. म्हणूनच तुम्ही त्यांना पोर्टेबल चार्जेर देखील भेट देऊ शकता.पोर्टेबल चार्जेर ५०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत मिळू शकतो.
ट्रिमिंग किट (Trimming Kit)
पुरुषांना ट्रिमिंग किट गिफ्ट म्हणून देणं हा एक चांगला पर्याय आहे. आजकाल बहुतेक पुरुषांना वेगवेगळ्या पद्धतीची दाढी ठेवायला आवडते. किंवा ट्रेंडनुसार दाढी मिशी ठेवण्याचे पॅटर्न बदलत असतात त्यामुळे ट्रिमिंग किट गिफ्ट म्हणून देऊ शकता. बेसिक ट्रिमिंग किट १,५०० रुपयांपर्यंत मिळेल.
परफ्युम (Perfume)
जर त्या व्यक्तीला परफ्युम किंवा डियो वापराची आवड असल्यास, परफ्युम गिफ्ट म्हणून देणे बेस्ट ठरू शकते. त्याच्या सुगंधाने त्यांना केवळ फ्रेश वाटणार नाही तर, नेहमी तुमची आठवण करून देईल. परफ्युम ३०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होऊ शकतो.
स्मार्ट वॉच (Smart Watch)
ऑफिसला जाणारे असोत की कॉलेजला जाणारे, पुरुषांना अनेकदा घड्याळे घालायला आवडतात. अशावेळी पुरुषांना स्मार्ट वॉच भेट म्हणून दिले जाऊ शकते. बेसिक स्मार्ट वॉच १,५०० रुपयांपर्यंत मिळेल.
स्मार्ट बॅंड (Smart Band)
हार्ट बीट्स, कॅलरीज, फुटस्टेप्स काऊंट होतील असे एखादे स्मार्ट बॅंड गिफ्ट करा. जेणेकरून ते केवळ वेळ पाहण्यासाठी म्हणून नाही तर इतर कामांसाठी देखील वापरू शकतात. गॅजेट्स वापरण्याची हौस आणि आवड असणाऱ्यांना हे बेस्ट गिफ्ट आहे. स्मार्ट बँड ९०० ते २००० पर्यंतच्या किंमतीत मिळू शकते. याहून महागड्या किंमतीचे बँडसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत.