रश्मिका मंदानाच्या लाईट वेट साड्यांचे १० लूक; पार्टी असो की लग्नसोहळा-साधेपणातही सौंदर्य उजळेल
Updated:December 15, 2024 11:54 IST2024-12-14T15:28:00+5:302024-12-15T11:54:31+5:30
Rashmika Mandanna's light weight sarees : रश्मिका मंदानाचे काही सिंपल साडीतले फोटो तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. असा लूक तुम्ही केल्यास सगळ्यात उठून दिसाल.

पार्टी असो किंवा घरात कोणतंही फंक्शन असतो लाईटवेट साड्या प्रत्येकालाच नेसायला आवडतात. कारण या साड्यांमुळे सुंदर लूक येतो आणि जास्त झगमग लूक न येता साडी शोभून दिसते. (Rashmika Mandanna's light weight sarees)
रश्मिका मंदानाचे काही सिंपल साडीतले फोटो तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. असा लूक तुम्ही केल्यास सगळ्यात उठून दिसाल.
नाईट पार्टीसाठी सिक्वेंन्स साडी आणि डिप व्ही नेकचं ब्लाऊज उत्तम कॉम्बिनेशन आहे. या लूकमध्ये तुमचे कॉलर बोन्स फ्लॉन्ट करू शकता.
हळदी रंगाची साडी तुम्ही डेली वेअर किंवा पार्टी वेअरसाठीसुद्धा घालू शकता.
स्लिव्हजलेस गोल्डन ब्लाऊजवर कोणतीही शिफॉन साडी उठून दिसेल.
डीप व्ही नेक ब्लाऊज आणि पिंक साडीत तुम्ही सुंदर तितकेच हॉट दिसाल.
नेटच्या साड्या इव्हरग्रीन आहेत. तुम्ही कोणत्याही खास प्रसंगांना या साड्या नेसू शकता.
फूल स्लिव्हजचं ब्लाऊज आणि बेबी पिंक रंगाची साडी हे कॉम्बिनेशनही सुंदर दिसेल.
खास प्रसंगांना तुम्ही ऑफ व्हाईट रंगाची साडी नेसू शकता.