रेडीमेड पफ स्लिव्हज ब्लाऊजचे १० पॅटर्न; जुन्या साडीवर घाला पफ स्लिव्ह ब्लाऊज, आकर्षक लूक
Updated:January 7, 2025 18:05 IST2025-01-05T13:16:13+5:302025-01-07T18:05:51+5:30
10 Patterns of Ready Made Puff Sleeve Blouses : पफ स्लिव्हजचे हे ब्लाऊज युनिक लूक देते आणि पर्सनॅलिटीही चांगली दिसते.

ब्लाऊजच्या स्लिव्हजमध्ये आजकाल बरेच नवनवीन पॅटर्न्स आले आहेत. हे पॅटर्न तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता. (10 Patterns of Ready Made Puff Sleeve Blouses)
शिफॉन, सिल्क, ऑर्गेंजा अशा कोणत्याही साड्यांवर रेडीमेड पफ स्लिव्हजचं ब्लाऊज शोभून दिसेल.
यात बेल बॉटम, बलून स्टाईल असे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला दिसून येतील.
नवीन साड्यांवर तुम्ही असे ब्लाऊज शिवून घेऊ शकता किंवा रेडीमेड ब्लाऊज विकत घेऊ शकता.
जर तुम्ही आधी कोणत्या साडीवर साधं ब्लाऊज शिवलं असेल तर आता रेडीमेड ब्लाऊज विकत घेऊन मॅचिंग करू शकता.
वेलवेटचे ब्लाऊजही पफ स्लिव्हजमध्ये छान दिसते.
तुम्ही यात आपल्या आवडीनुसार गोल गळा, पंचकोनी, व्ही नेक किंवा क्लोज नेक निवडू शकता.
गोल्डन काठ असलेल्या सिल्कसाडीवर असं ब्लाऊज शोभून दिसेल.
जर तुमचे दंड फारच बारीक असतील तर तुम्ही असं ब्लाऊज शिवू शकता. ज्यामुळे सुंदर युनिक लूक येईल.
गोल्डन आणि नेटचं ब्लाऊज तुम्हाला कोणत्याही सिंपल साडीवर सुंदर लूक देईल.