Join us   

सोन्याच्या कानातल्यांचे पाहा १० युनिक डिजाईन्स; रोज वापरासाठी सुंदर-ऑफिस वेअर पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 2:32 PM

1 / 10
कानातले घातले नाहीत तर चेहऱ्याचा लूक खुलत नाही आणि हवातसा लूकही येत नाही. कानातल्यांमुळे चेहरा उठून दिसतो आणि रेखिव दिसतो. सतत कानातल्यांची काढ-घाल करायला नको वाटतं. अशावेळी तुम्ही रोजच्या वापरासाठी सुंदर कानातले घेऊ शकता. (10 Unique Designs of Gold Earrings for Daily Wear)
2 / 10
सोन्याचे कमी ग्रॅमचे कानातले रोज वापरण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. हे कानातले ड्रेस, साडी, वनपीस, कुर्ता कशावरही उठून दिसतील आणि तुमचा लूक खुलून येईल.
3 / 10
सोन्याचे कानातले मोठे असतील तर ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी घालू शकणार नाही. कारण तासनतास मोठे कानातले घातल्यामुळे कानांना त्रास होऊ शकतो. छोटया कानातल्यांच्या सिंपल डिजाईन्स तुम्हाला पाहता येतील.
4 / 10
२ ते ३ ग्रॅमपासून १० ग्रॅमपर्यंत तुम्हाला हव्यातश्या कानातल्यांच्य डिजाईन्स पाहता येतील. असे कानातले उठून दिसतात आणि चेहरा जास्त मोठाही दिसत नाही.
5 / 10
सोन्याच्या कानातल्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटिज उपलब्ध होतील. तुम्ही आपल्या आवडीनुसार चेहऱ्याला सुट होईल असे कानातले निवडू शकता.
6 / 10
कानातले शोभून दिसतील असे असतील तर तर चेहराही नाजूक आणि सुंदर दिसतो.
7 / 10
पानं, फुलं, फुलपाखरू याशिवाय वेगवेगळ्या शेपमध्ये तुम्हाला हे कानातले उपलब्ध होतील.
8 / 10
झुमक्यांच्या छोट्या डीजाईन्सही मिळतील. रिंग्स किंवा रिंग्सच्यामध्ये गोल्डन मणी असलेले कानातलेही ट्रेंडीग आहेत.
9 / 10
कानातल्यांमध्ये जितकी बारीक डिजाईन असेल तितकेच ते उठून दिसतात.
10 / 10
(Photo Credit- Social Media)
टॅग्स : खरेदीफॅशन