Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2024 5:10 PM 1 / 10अनेक पुरुष, स्त्रिया उजव्या हातात कासवाचे चिन्ह असणारी अंगठी घालतात. कासव अंगठी, कासवाची अंगठी किंवा कछुआ रिंग म्हणून ही अंगठी ओळखली जाते.(kasav ring dessigns)2 / 10गुडलक समजली जाणारी ही अंगठी तुम्हालाही घ्यायची असेल तर सध्या तिच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आले आहेत. (10 unique patterns of kachua ring)3 / 10अशा प्रकारचे काही डिझाईन्स तर अतिशय नाजूक आणि सुबक आहेत. (shopping tips for kasavachi angathi)4 / 10ज्यांना कासवासोबतच पंचरत्न किंवा सात रत्न असणारी अंगठी घालायची असेल ते लोक हा पर्याय निवडू शकतात. यामध्ये कासव आणि रत्न यांची सुंदर मांडणी केली आहे.5 / 10ज्यांना कोणतेही एकच रत्न घालायचे असेल ते लोक अशा पद्धतीने ते रत्न कासवाच्या अंगठीमध्ये जडवून घेऊ शकतात.6 / 10ही बघा एकदम नव्या पद्धतीची कासवाची अंगठी. तरुण मंडळी अशा पद्धतीची कासव अंगठी घेण्यास पसंती देतात.7 / 10अशा पद्धतीची श्री यंत्र असणारी अंगठीही कासव अंगठी या प्रकारात मिळते.8 / 10थोडं ठसठशीत दिसणारं श्री यंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या अंगठीची निवड करू शकता. अशा पद्धतीची अंगठी थोडी जाडसर असल्याने ती पुरुषच अधिक प्रमाणात घालतात.9 / 10पांढरे स्टोन लावून जडवलेली कासव अंगठीही हातावर खूप छान दिसते. तिचा लूक अतिशय डिसेंट वाटतो. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications