टरबूज खरेदी करायचंय? सोप्या ३ टिप्स- काही सेकंदात ओळखा टरबूज गोड आणि लाल आहे की नाही..

Updated:March 20, 2025 17:09 IST2025-03-20T13:34:32+5:302025-03-20T17:09:21+5:30

टरबूज खरेदी करायचंय? सोप्या ३ टिप्स- काही सेकंदात ओळखा टरबूज गोड आणि लाल आहे की नाही..

आपण जे टरबूज खरेदी करणार आहोत ते गोड निघणार आहे की पांचट निघणार आहे हे ओळखण्यासाठी या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतात..

टरबूज खरेदी करायचंय? सोप्या ३ टिप्स- काही सेकंदात ओळखा टरबूज गोड आणि लाल आहे की नाही..

यासाठी तुम्हाला टरबूज चिरून बघण्याचीही गरज नाही. टरबूज घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ sonianarangsdietclinics या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

टरबूज खरेदी करायचंय? सोप्या ३ टिप्स- काही सेकंदात ओळखा टरबूज गोड आणि लाल आहे की नाही..

त्यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला मुद्दा असा की टरबूजामध्ये गोल आणि लंबगोल असे दोन आकार मिळतात. त्यापैकी गोल टरबूज घ्या. कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. तर जे लंबगोल आकाराचे टरबूज असते त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याची गोडी कमी असते.

टरबूज खरेदी करायचंय? सोप्या ३ टिप्स- काही सेकंदात ओळखा टरबूज गोड आणि लाल आहे की नाही..

ज्या टरबूजावर पिवळट रंगाचा डाग असतो ते टरबूज जास्त गोड असते. पांढरट रंगाचा डाग असणारे टरबूज कमी गोड निघते. कारण त्याच्यावरचा पांढरा डाग असं सांगतो की ते टरबूज पिकण्याच्या आधीच तोडून घेतलेलं आहे.

टरबूज खरेदी करायचंय? सोप्या ३ टिप्स- काही सेकंदात ओळखा टरबूज गोड आणि लाल आहे की नाही..

प्रत्येक टरबुजावर रेषा असतात. बारकाईने निरिक्षण केल्यास या रेषा लगेच दिसतात. ज्या टरबुजावरच्या रेषा एकमेकींच्या जवळ आलेल्या असतात ते टरबुज पिकलेले असते आणि त्यामुळे गोड निघते. ज्या टरबुजावरच्या रेषांमध्ये जास्त अंतर असते ते टरबूज अजून पिकायचे राहिलेले असते.