5 types of Anarkali dress for wedding season
अनारकली ड्रेसचे ५ सुंदर पॅटर्न्स; लग्नसराईसाठी ठरेल 'परफेक्ट चॉईस'- दिसाल स्टायलिश, आकर्षकPublished:November 25, 2024 02:26 PM2024-11-25T14:26:31+5:302024-11-25T14:31:11+5:30Join usJoin usNext सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. त्यामुळे लग्नात घालायला अनारकली ड्रेस घ्यायचा असेल तर त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते (different patterns in Anarkali dress), त्यातला कोणता प्रकार तुम्हाला जास्त शोभून दिसू शकतो किंवा सध्या अनारकली ड्रेसचा कोणता प्रकार जास्त ट्रेडिंग आहे याची थोडी माहिती असायलाच पाहिजे. त्यासाठीच बघा या काही खास टिप्स.(5 types of Anarkali dress for wedding season) १. कॉटन अनारकली ड्रेस- हा एक सुंदर अनारकली पॅटर्न बघा. हा अनारकली ड्रेस कॉटनमध्ये येतो आणि तो थंडीत तसेच उन्हाळ्यात घालण्यासाठी अतिशय आरामदायी ठरतो. एखाद्या कार्यक्रमात तर तुम्ही तो घालूच शकता. पण त्याशिवाय ऑफिसवेअर म्हणूनही तो उत्तम पर्याय ठरतो. त्यामुळे अशा दोन्ही उद्देशाने त्याचा वापर होत असल्याने अनेकजणी हल्ली कॉटन अनारकली घेणे पसंत करतात. २. अंगरखा अनारकली सेट- हा आहे अंगरखा प्रकारातला अनारकली ड्रेस. नेहमीच्या अनारकली लूकपेक्षा हा थोडा वेगळा लूक देतो. जर तुम्ही थोड्या जाड असाल किंवा उंची कमी असेल तर अशा पद्धतीचा अंगरखा अनारकली ड्रेस घ्या. यामध्ये तुम्ही बारीक दिसू शकता तसेच जास्त स्मार्ट लूक मिळू शकतो. ३. फ्लाेअर लेन्थ अनारकली ड्रेस- यालाच आपण अनारकली वनपीस असं देखील म्हणू शकतो. ज्या मुली उंच आणि स्लिम असतात त्यांना हा ड्रेस जास्त शोभून दिसतो. कमी उंचीच्या मुलींनी हा ड्रेस घातल्यास त्यांची उंची आणखीनच कमी वाटू शकते. ४. लेअर्ड अनारकली ड्रेस- अशा एकावर एक झालर दिसत असतील तर तो लेअर अनारकली या प्रकारातला असतो. ज्या मुली खूपच बारीक असतात, त्यांनी थोडं हेल्दी दिसण्यासाठी अशा पद्धतीच्या ड्रेसची निवड करावी. अनारकली ड्रेसचा हा पॅटर्न अधिक भरीव आणि आकर्षक वाटतो. ५. जॅकेट अनारकली ड्रेस- अशा प्रकारचा जॅकेट अनारकली ड्रेससुद्धा सध्या खूप ट्रेडिंग आहे. लग्नसराईमध्ये घालायला तुमच्याकडे एखादा तरी असा ड्रेस असायलाच पाहिजे. टॅग्स :खरेदीफॅशनस्टायलिंग टिप्सShoppingfashionStyling Tips