Adhik maas Special: Options for giving vaan to son in law, Gifts for jamai in adhik maas
अधिकमास स्पेशल: जावयाला वाण द्यायला स्टिलचं ताटच कशाला, पाहा ३ सुंदर-सुबक पर्यायPublished:August 9, 2023 01:54 PM2023-08-09T13:54:34+5:302023-08-09T16:40:30+5:30Join usJoin usNext १. अधिक मासानिमित्त सध्या घरोघरी जावयाचे आगतस्वागत मोठ्या उत्साहात सुरू आहे. जावयासाठी खास पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो आहे. शिवाय इतर आहेर, भेटवस्तू यांच्यासोबतच अनारसे आणि इतर गोड पदार्थांनी भरलेलं ताट वाण म्हणूनही दिलं जातंय. २. अधिक मासाचा महिना आता सरत आला असला तरी अनेकांचे धोंडेजेवण अजून राहिलेले आहे. येणारा शनिवार- रविवार हा अधिक मासातला शेवटचा विकेंड. त्यामुळे या विकेंडला अनेकांचे धोंडे कार्यक्रम होणार आहेत. जावयाला वाण देण्यासाठी अजूनही स्टीलच्या ताटाची खरेदी झाली नसेल, तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या... स्टीलच्या ताटाऐवजी असे काही नक्कीच देता येईल. ३. हल्ली अनेक घरांमध्ये स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या एकसारख्या ६ किंवा १२ ताटांचा सेट असतो. वाणात मिळालेलं ताट या सेटवर मॅच होत नाही. त्यामुळे मग अनेक जणी ते वापरात न काढता तसंच ठेवून देतात. म्हणूनच वाण देण्यासाठी स्टीलच्या ताटाऐवजी इतर कोणत्या उपयुक्त वस्तूचा विचार नक्कीच करता येऊ शकतो. ४. स्टीलच्या ताटाऐवजी पितळी ताट किंवा डिश देऊ शकता. औक्षण करण्यासाठी, आरतीसाठी किंवा देवपुजेसाठी या ताटाचा किंवा ताम्हणाचा वापर चांगला करता येईल. ५. पितळी ताटाची किंवा औक्षणाच्या थाळीची किंमत जरा जास्त आहे. त्यापेक्षा थोडा स्वस्त पर्याय पाहिजे असेल तर तांब्याची थाळी किंवा ताटाचा विचार करू शकता. या थाळीचाही औक्षण किंवा देवपुजा अशा कामासाठी उपयोग करता येईल. ६. लेकीला जर सजावटीची आवड असेल, तर तिच्या नवऱ्याला वाण देण्यासाठी आकर्षक तबकाचा, कटोऱ्याचा किंवा ट्रे चा विचार करू शकता. फुलांची आरास करण्यापासून ते दिवाळीत दिवे लावण्यापर्यंत वेगवेगळ्या कामासाठी तबकाचा वापर करता येतो. एखादा पदार्थ ठेवण्यासाठीही असा कटोरा, ट्रे वापरता येतो. टॅग्स :खरेदीअधिक महिनागिफ्ट आयडियाShoppingAdhik MaasGift Ideas