Akshaya Tritiya 2022 : अक्षय्यतृतीयेला सोने खरेदीचा बेत? पाहा मंगळसूत्र आणि कानातल्यांचे सुंदर डिझाइन्स, पडाल प्रेमात By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2022 3:54 PM 1 / 9अक्षय्य तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महिला वर्ग आवर्जून सोन्याची खरेदी करतात (Akshaya tritiya 2022). सोनं म्हटल्यावर महिलांमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी गोष्ट म्हणजे मंगळसूत्र, अंगठ्या आणि कानातली. रोज घातल्याच जाणाऱ्या या गोष्टी आदलून बदलून वापरल्या आणि कितीही असल्या तरी पुरत नाहीत (Mangalsutra Shopping). अक्षयतृतीयेला खरेदीचा बेत आखत असाल तर पाहा मंगळसूत्र आणि कानातल्यांचे एक से एक पर्याय...2 / 9भारतीय स्त्रीचा सौभाग्यालंकार असलेले मंगळसूत्र लग्नानंतर सामान्यपणे नियमित वापरले जाते. पण रोज एकच एक मंगळसूत्र घालून आपल्याला कंटाळा येतो अशावेळी आपल्याकडे एखाद दोन पर्याय असले तरी चालतात. म्हणजे अखाद्या लहान फंक्शनला जाताना आपण आवर्जून बदलून वापरु शकतो. 3 / 9पारंपरिक साडीवर सूट होणारे मंगळसूत्र आणि कानातले पाहत असाल तर मोत्याचे पेंडंट असलेल्आ मंगळसूत्राची सध्या चांगलीच फॅशन आहे. यामध्ये मध्यभागी पेंडंट म्हणून नथ किंवा मोत्याचे डिझाईन पाहायला मिळते. कानातलेही त्याला अगदी मॅच होणारे असतील तर आपला पारंपरिक लूक खुलून येतो. पारंपरिक मोत्यामध्ये येणारा आणि कमी ग्रॅममध्ये बसणारा हा प्रकार हा प्रकार सध्या एकदम फॅशन इन आहे. 4 / 9खड्याचे मंगळसूत्र तर सर्वच वयोगटातील महिलांची पहिली पसंती असते. साडीपासून ते जीन्स आणि वनपीसपर्यंत सगळ्या प्रकारच्या कपड्यांवर उठून दिसणारे हे मंगळसूत्र सर्रास वापरले जाते. यावर मॅचिंग कानातले असतील तर त्याची शोभा आणखी वाढते. बऱ्याच सोनारांकडे या मंगळसूत्रांची खास रेंज पाहायला मिळते.5 / 9डेली वापरासाठीच पण थोडे ठसठशीत डिझाईन असलेले मंगळसूत्र घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट थोडे जास्त असेल तर काळ्या मण्यांमध्ये सोनेरी पेंडंट असलेले हे मंगळसूत्र आणि त्याला साजेसे कानातले हा एक उत्तम पर्याय असू शकतो. यामध्येही सध्या बऱ्याच नाजूक डिझाइन्स पाहायला मिळतात. यातील पेंडंट आणि कानातले सोन्याचे असल्याने बजेट थोडे जास्त जाऊ शकते.6 / 9वेस्टर्न आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर जाईल असा हा सेट डेली यूजसाठी किंवा बदलून वापरण्यासाठी उत्तम पर्याय आहे. याचे कानातलेही टॉप्स स्वरुपातले असल्याने रोजच्या वापरासाठी आपण याचा नक्कीच विचार करु शकतो. अशाप्रकारचे सेट १ ग्रॅम सोन्यापासून ते २४ कॅरेट सोन्यामध्ये सहज उपलब्ध असतात. मात्र तुमचा फार वापर नसेल तर तुम्ही बेंटेक्स किंवा नुसते सोनेरी पॉलिश असलेले खोटाही सेट खरेदी करु शकता.7 / 9 मोत्याचे लोलक असलेले पेंडंट आणि नाजूक कानातले असा मंगळसूत्राचा सेट घालायला अतिशय छान वाटतो. एखाद्या लहान समारंभाला हा सेट अगदी उठून दिसतो. सिंपल आणि सोबर लूक देणाऱ्या या प्रकारात बरेच पर्याय उपलब्ध असतात. नाजूक नक्षीकामामुळे डेली वेअरसाठी आपण याचा नक्की विचार करु शकतो. 8 / 9सिंगल काळ्या मण्यांची पोत आणि त्याला खाली खड्याचे किंवा रिअल डायमंडचे पेंडंट हा तर वर्षानुवर्षे तमाम महिला वर्गाला आवडणारा प्रकार आहे. एलिगंट लूक देणारा हा प्रकार तुम्ही घातलात तर तुमचे वाढलेले वय लपण्यासही मदत होऊ शकते. तसेच कोणत्याही प्रकारच्या कपड्यावर हे उठून दिसते. कॅऱी करायला हा प्रकार अतिशय सोपा असतो. 9 / 9दोन किंवा एक वाट्यांच्याऐवजी मध्यभागी खडा किंवा मोत्याच्या पेंडंटची सध्या बरीच फॅशन आहे. काळ्या मण्यांमध्ये पांढरा किंवा मोतिया रंगाचा मोती अतिशय छान उठून दिसतो. तुम्हाला मोती आवडत असेल तर लोलकाप्रमाणे लटकणारे हे कानातलेही पंजाबी ड्रेस, कुर्ती, पारंपरिक कपडे अशा कशावरही उठून दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications