दिवाळीसाठी सुंदर अनारकली ड्रेस घ्यायचाय? बघा लेटेस्ट ६ पॅटर्न्स, रॉयल लूक-दिसाल हटके... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 11:42 AM 1 / 8अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असून खरेदीची धामधूम सुरू झाली आहे. २ वर्षानंतर सणवार मोठ्या उत्साहात साजरे होत असल्याने दिवाळीसाठी काय खरेदी करायची याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत. बाजारात आणि ऑनलाईनही अनारकली ड्रेसचे बरेच पॅटर्न्स पाहायला मिळतात, पाहूया असेच काही लेटेस्ट पॅटर्न्स (Anarkali Dress Patterns For Diwali Shopping).2 / 8बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते अगदी सामान्य मुलींपर्यंत सगळेच हल्ली अनारकली प्रकाराला पसंती देताना दिसतात. यामध्ये वेगवेगळे रंग आणि पॅटर्न उपलब्ध असल्याने आणि त्यामध्ये तुमचा लूक खुलून येत असल्याने अनारकलीला गेल्या काही वर्षात पुन्हा डीमांड आली आहे. 3 / 8कळ्यांचा किंवा मोठा घेर असलेला ड्रेस किंवा कुर्ता आणि त्यावर डिझायनर ओढणी असा पॅटर्न सध्या फॅशन इन आहे. अशावेळी ड्रेसचा घेर आणि ओढणीच सगळा लूक देत असल्याने ड्रेसवर फारशी डीझाईन नसली तरी चालतं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यांचे आणि बाह्यांचे पॅटर्न सुंदर दिसतात. असे ड्रेस आपण शिवूनही घेऊ शकतो. 4 / 8खूप मोठा घेर आणि मध्यभागी कट असलेला हा ड्रेस घातल्यावर अतिशय सुंदर दिसतो. तुम्हाला हाईट असेल किंवा तुम्ही हिल्स वापरत असाल तर अशाप्रकारचा ड्रेस तुमचा लूक आणखी खुलवतो. यावर असलेले बारीक नक्षीकाम ड्रेसला फारच सुंदर बनवते.5 / 8फार हेवी कपडे नको असतील आणि त्याचा म्हणावा तितका वापर होत नसेल तर कॉटनचे पण छातीपाशी थोडा वेगळा पॅटर्न असणारे हे अनारकली कुर्तेही मस्त दिसतात. हे कुर्ते आपण एखाद्या लहानशा फंक्शनलाही सहज घालू शकतो. 6 / 8काही वेळा आपल्याला घोळदार ड्रेस असला की ओढणी नको वाटते. इतके सगळे सांभाळायचा आपण कंटाळा करतो. अशावेळी या अनारकली ड्रेसवर एखादे लॉंग जॅकेट असेल तर ड्रेसचा लूक आणखी खुलून यायला मदत होते. 7 / 8अभिनेत्रींप्रमाणे थोडे हेवी प्रकारात हे ड्रास पाहत असाल तर टिकल्यांचे वर्क असलेले, आरशांचे वर्क, दोरा वर्क असे एक ना अनेक प्रकार यामध्ये पाहायला मिळतात. आपल्या आवडीनुसार विविध रंगात येणारे हे ड्रेस आपला लूक खुलवायला मदत करतात. 8 / 8 या अनारकली ड्रेसच्या किंमती खूप जास्त असल्याने आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार एखादा पॅटर्न करायचा असेल तर आजीच्या, आईच्या किंवा अगदी स्वत:च्याही एखाद्या साडीचा ड्रेस तुम्ही नक्कीच शिवून घेऊ शकता. यामध्येही तुम्हाला वेगवेगळ्या ओढण्या घेऊन काठांचे आणि पदरांचे पॅटर्न्स करता येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications