लग्नसराई स्पेशल: पाहा अंगठ्यांचे ७ सुंदर पर्याय, ‘कपल रिंग’चा नवा खास ट्रेंड
Updated:January 28, 2025 15:05 IST2025-01-28T14:50:19+5:302025-01-28T15:05:36+5:30

साखरपुड्यात नवरा, नवरी यांनी वेगवेगळ्या डिझाईन्सच्या अंगठ्या घेण्याचा जमाना आता गेला आहे. आता हल्लीची पिढी कपल रिंग घेते. एकमेकांच्या आवडीनिवडी जपत घेतलेली एकसारखी कपल रिंग त्यांना जणू आता या क्षणापासून पुढे आयुष्यभर एकमेकांच्या आवडीनिवडी जपा असंच सांगत असते..
साखरपुड्याच्या, लग्नाच्या निमित्ताने तुम्हालाही कपल रिंग घ्यायच्या असतील तर हे काही सुंदर डिझाईन्स पाहा..
अशा पद्धतीने काही अंगठ्या अगदी एकसारख्या असतात. सोने, प्लॅटिनम या प्रकारात अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत.
अशा पद्धतीचे बदामाचे डिझाईन असणारी अंगठी हल्लीच्या नव्या पिढीला अतिशय आवडते.
बदामाच्या डिझाईनच्या अंगठीचं हे एक वेगळं डिझाईन पाहा. दोघांच्याही अंगठ्या जेव्हा जवळ आणल्या जातात तेव्हा त्यातून बदामाचा आकार तयार होतो.
ज्यांना अंगठीवर खूप जास्त वर्क आवडत नाही त्यांच्यासाठी अशा अतिशय सोबर आणि सिंपल लूक देणाऱ्या कित्येक अंगठ्या उपलब्ध आहेत. सध्या अशा सिंपल ॲण्ड क्यूट अंगठीची मागणी वाढते आहे.
एकमेकांची नावे असणाऱ्या अशा अंगठ्याही अनेकजण कस्टमाईज करून घेतात. त्यांच्यातून एकमेकांबद्दलचे वेगळेच प्रेम दिसून येते.
हे चिन्ह आहे इन्फिनिटीचं. त्याचा अर्थ होतो अमर्याद. अंगठी हे प्रेमाचं प्रतिक. आमचं एकमेकांवरचं प्रेमही अमर्याद आहे, या भावनेतून अनेक जण या चिन्हाच्या अंगठीची खरेदी करतात. आलिया भटने तिच्या लग्नात जे मंगळसूत्र घातलं होतं, त्याचं पेंडंट अशाच चिन्हाचं होतं. तेव्हापासूनच या इन्फिनिटीच्या चिन्हाचं मंगळसूत्र, अंगठी, कानातले यांची फॅशन आली आहे.