Join us

ऑक्सिडाईज सुंदर जोडवी मिळतील फक्त १५० रुपयांत, पाहा लेटेस्ट डिझाइन्स खास सणावारांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2024 13:02 IST

1 / 8
विवाहित महिलांसाठी असणारा एक दागिना म्हणजे पायातली जोडवी. पुर्वी एकाच प्रकारची टिपिकल जोडवी मिळायची. पण आता मात्र त्यात कित्येक नवनविन प्रकारचे डिझाईन्स आले आहेत.(beautiful oxidize toe ring at low price)
2 / 8
सणावाराचे दिवसही आता सुरू होत आहे. काही जणी एरवी घालत नसल्या तरी सणावाराला मात्र आवर्जून सगळे दागिने घालून तयार होतात. तुम्हालाही त्यानिमित्ताने स्वस्तात मस्त जोडवी घ्यायची असतील तर हे काही डिझाईन्स नक्की पाहा.. (latest designs of oxidised toe ring)
3 / 8
अशा पद्धतीची जोडवी एखाद्या कार्यक्रमासाठी खूप शोभून दिसतील. अतिशय सुंदर आणि वेगळं गुलाबाच्या फुलांचं हे डिझाईन पाहताक्षणीच सगळ्यांना आवडणारं आहे.
4 / 8
अशा प्रकारची ही जोडवी तुम्हाला रोज वापरायलाही चांगली आहेत. नाजूक आणि सुंदर डिझाईन असल्यामुळे तुम्ही ते जीन्सवरही घातलं तरी वावगं दिसणार नाही.
5 / 8
ऑनलाईन शॉपिंग साईटवरून तुम्ही ऑक्सिडाईज जोडव्यांचा हा कॉम्बो सेटदेखील घेऊ शकता. यात अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स उपलब्ध आहेत. १५० ते २०० रुपयांदरम्यान हा कॉम्बो सेट मिळतो.
6 / 8
सुंदर नाजूक खड्यांची फुलं आणि हिरव्या खड्याचं पान हे डिझाईनही अतिशय वेगळं आहे.
7 / 8
रोज वापरण्यासाठी हे आणखी एक डिझाईन पाहा. हे देखील तुम्हाला नक्कीच आवडू शकतं.
8 / 8
फक्त सणासुदीला घालायला ठसठशीत डिझाईन्स घेणार असाल तर हा एक पर्याय चांगला आहे.
टॅग्स : खरेदीदागिने