Blouse designs for kathpadar saree : काठापदरच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाइलचे काकूबाई ब्लाउज घालताय? हे घ्या एकापेक्षा एक Wow पॅटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 2:09 PM 1 / 16कितीही नवीन फॅशन्स आल्या तरी काठा पदराच्या (Blouse Designs for kathpadar saree) साड्यांची फॅशन काही जूनी होत नाही आणि होणारही नाही. पैठणी, नारायण पेठ, पेशवाई, सिल्कचे वेगवेगळे प्रकार या साड्यांवर तुम्ही हवे तसे एकपेक्षा एक ब्लाऊज शिवू शकता. (Image Credit - wedlockindia.com, Pintrest, Social Media) 2 / 16पण तरीही नेहमी तेच तेच काकूबाई टाईप ब्लाऊज मुली शिवतात. त्यामुळे महागड्या साड्यांमध्येही हवा तसा लूक मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काठापदराच्या साडीवरच्या खास ब्लाऊज डिजाईन्स (Latest blouse designs pattern) दाखवणार आहोत. 3 / 16सध्या काठापदराच्या साडीवर बोट नेक ब्लाऊजची फॅशन जोरात चालतेय. बोट नेक ब्लाऊजमुळे तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज नसते. फक्त सुंदर कानातले घातले तरी लूक खुलून दिसतो. 4 / 16ब्लाऊजवर पूर्वी फुग्यांची फॅशन खूप केली जायची. आता पुन्हा ही फॅशन दिसतेय. तुम्ही फुग्यांच्या फॅशनचे ब्लाऊज शिवून लूक खूलवू शकता. 5 / 16सिंपल ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही मागच्या गळ्याला वेगवेगळे पॅटन्स शिवू शकता. त्यासाठी तुम्हाला फार खर्च लागणार नाही. 6 / 16तुम्ही हवं तर ब्लाऊजला लेस, गोंडेसुद्धा लावू शकता. याशिवाय मोठ्या काठांच्या साडीसाठी तुम्ही कोणतंही पॅटर्न न शिवता सिंपल ब्लाऊज ठेवलं तरी क्लासी लूक येईल.7 / 16ब्लाऊजच्या बॅकसाईडसाठी तुम्हाला खूप नवीन डिजाईन्स ट्राय करून बघता येतील. 8 / 16कोणतंही नव्या पॅटर्नचं ब्लाऊज शिवताना चांगल्या टेलरकडे शिवायला द्या. कारण अनेकदा बायका महागड्या साड्या घेतात पण नवीन पॅटर्न टेलरला न जमल्यामुळे ब्लाऊजचा लूक बिघडतो. यात पैसेही वाया जातात आणि चांगला लूक पण येत नाही म्हणून जास्त पैसे लागले तरी चालेल पण चांगल्या टेलरकडून ब्लाऊज शिवून घ्या.9 / 16याशिवाय थ्री- फोर हॅण्ड ब्लाऊजची फॅशन पण खूप चालते. थ्री फोर हॅण्ड्समध्येही तुम्हाला एकापेक्षा एक पॅटर्न पाहायला मिळतील. 10 / 16लग्नासराईत असे ब्लाऊज तुम्ही वापरले तर सगळ्यांपेक्षा तुमचा लूक जास्त उठून दिसेल. 11 / 16नेहमी तेच शिवण्यापेक्षा प्रत्येक साडीवर वेगवेगळे पॅटर्न कसं शिवता येईल याचा विचार करा. 12 / 16सध्या ट्रेडींग असलेल्या खणांच्या साडीवर, हिरकणी साडीवरच्या ब्लाऊजसाठीही तुम्ही ही फॅशन करू शकता. 13 / 16ऑफिसला किंवा पार्टीला साडी नेसण्यासाठी तुम्ही एखादं कॉलर नेक पॅटर्नचं ब्लाऊज शिवायला हवं. 14 / 16तुम्ही रेडीमेड नऊवारी साडी घेत असाल तर या स्टाईल ब्लाऊज शिवल्यानं खूप सुंदर दिसाल. 15 / 16(Image Credit - Wedlockindia.com, Pintrest, Social Media)16 / 16(Image Credit - Wedlockindia.com, Pintrest, Social Media) आणखी वाचा Subscribe to Notifications