Join us   

मुलांसाठी पावसाळी चपला/बूट खरेदी करताय? स्टाइलसोबत कम्फर्टही महत्त्वाचा, पाहा मुलांसाठी खास डिझाइन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2022 4:12 PM

1 / 8
उन्हाळ्याची सुट्टी संपून जूनमध्ये शाळा सुरू व्हायचे वेध लागले की शाळेचे दप्तर, डबा, बाटली, वह्या-पुस्तके, ड्रेस या सगळ्यांची शॉपिंग तर असतेच पण त्यासोबत आणखी एक महत्त्वाची शॉपिंग असते ती म्हणजे रेनकोट, रेनी शूज आणि छत्री यांचे. दरवर्षी नव्या फॅशनचे रेनी शूज घेण्यासाठी लहान मुलं आवर्जून हट्ट करतात.
2 / 8
बाजारात सध्या मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या रेनी शूज आणि चपलांचे अनेक आकर्षक नवनवीन पॅटर्न पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे आपण कोणीच बाहेर पडत नसल्याने खरेदीही पूर्णपणे बंद होती. पण यंदा शाळा आणि इतर गोष्टी पूर्वीप्रमाणे सुरू झाल्याने आपल्यासोबत लहान मुलांचीही जोरदार खरेदी सुरू आहे.
3 / 8
शाळा, क्लास किंवा इतर ठिकाणीही बाहेर जाताना पावसाळ्यात हमखास ठिकठिकाणी पाणी साठलेले असते. लहान मुलांना पाण्यात खेळायला आवडत असल्याने ते बाजूने जागा असली तरी त्यामध्ये उड्या मारणे, हे पावसाचे पाणी पायाने उडवणे असे प्रकार करताच. अशावेळी त्यांच्या पायाला पाण्यातील घाण लागू नये, कपडे शक्यतो स्वच्छ राहावेत या दृष्टीने पालक म्हणून आपण चांगल्या पावसाळी चपला किंवा बूट घेतो.
4 / 8
म्हटलं तर बूट पण म्हटलं तर चप्पल अशा पावसाळ्यासाठी मिळणाऱ्या या मोकळ्याढाकळ्या क्रॉक्सची गेल्या काही वर्षांपासून चांगलीच स्टाईल आहे. याला गोलांची डिझाईन असल्याने पाणी तर साठून राहत नाहीच पण हे मोकळे आणि तरीही बंद असल्याने पाय झाकले जाऊन खराब होण्याचीही शक्यता नसते. काढायला-घालायला आणि सगळ्यात महत्त्वाचे वाळण्यासाठी क्रॉक हा प्रकार अतिशय सोपा असल्याने अनेक जण चपलांच्या या हटके प्रकाराला पसंती देतात. इतकेच नाही तर हा प्रकार युनीसेक्स असल्याने मुलांसाठी आणि मुलींसाठी एकाचवेळी खरेदी करता येऊ शकते.
5 / 8
मुलींच्या चपलांमध्ये वेगवेगळे रंग आणि नाजूक अशा अनेक आकर्षक डिझाईन्स पाहायला मिळतात. त्यामुळे एखादा सणावाराचा किंवा थोडा हेवी ड्रेस घातला असेल तरी या चमचमत्या किंवा हिल्स असलेल्या अशा काहीशा फॅशनेबल चपला मुली भर पावसातही कॅरी करु शकतात. यामध्ये सँडल्स, बुटीज असे बरेच डिझायनर प्रकार पाहायला मिळतात.
6 / 8
आपले मूल ५ वर्षाच्या आतले असेल तर त्याच्यासाठी पाय गुडघ्यापर्यंत झाकले जाणारे गम बूटसारखे रबरी पावसाळी बूट बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये अतिशय आकर्षक रंग असून त्यावर वेगवेगळ्या प्राण्यांची, पक्ष्यांची चित्रे असल्याने लहान मुलांना हे बूट घातल्यावर फारच छान दिसतात. यामुळे मुलांच्या निष्पापपणात आणखी भर पडते आणि मुख्य म्हणजे याचा आकार मोठा असल्याने या बूटमध्ये किंवा पायात अजिबात पाणी जात नाही.
7 / 8
लहान मुलांवर गडद रंग खुलून दिसत असल्याने त्यांच्या स्लिपरपासून ते शूजपर्यंत सगळ्या गोष्टी अतिशय रंगीबेरंगी आणि आकर्षक असतात. वेगवेगळे कार्टून, चित्र यांमुळे मुले या चपलांकडे नकळत आकर्षित होतात. एरवी आपण चपला किंवा बुटांचे गडद रंग घेताना १० वेळा विचार करतो पण पावसाळ्यात अशाप्रकारच्या हटके चपला चांगल्या दिसत असल्याने वापरल्याही जातात.
8 / 8
मुलांना पावसाळ्यात जास्त काळ पावसाच्या पाण्यात राहिल्याने चिखल्या होणे, बूट चावणे, पायाला इन्फेक्शन होणे, पाय गारठून सर्दी होणे अशी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. मात्र असे होऊ नये म्हणून मुलांच्या पावसाळी चपलांची खरेदी ही छान व्हायला हवी. मुलांच्या आरोग्याला धोका उद्भवू नये यासाठी चपलांची खरेदी करताना काळजी घ्यायला हवी.
टॅग्स : खरेदीपाऊसलहान मुलं