Join us   

Cigarette Pants : विसरा टिपिकल लेगिन्स, चुडीदार; ट्राय करा सिगारेट पँटचा नवा ट्रेंड, पाहा नवनवीन पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 5:18 PM

1 / 12
कुर्ता लेगिन्स, चुडीदार घातलेल्या अनेकजणी तुम्हाला रोज दिसत असतील. सध्या सिगारेट पँटचा नवीन ट्रेंड खूप चर्चेत आहे.
2 / 12
चुडीदारमध्ये कंबरेला बांधायच्या नाड्या असतात त्यामुळे अनेकदा कंबरेभोवती वळ उमटतात. याऊलट सिगारेट पँट आरामदायक असतात, कंबरेच्या भागाजवळ आरामदायक इलास्टिक असते. (What Cigarette Pants)
3 / 12
या स्टाईलची पँट कुर्तीवरही चांगली दिसते आणि स्टायलिश लूक दिसतो. यातही प्लेन, तळाशी नेट असलेल्या, वेगवेगळ्या पॅटर्नचे पर्याय तुम्हाला उपलब्ध होती.
4 / 12
रंगीबेरंगी फुलं आणि साखळीच्या पॅटर्नचं कॉम्बिनेशन या पँटवर शोभून दिसतं. ऑफिस वेअरसह कॅज्यूअल वेअरसाठीही तुम्ही या पँटची निवड करू शकता.
5 / 12
अशी पँट शिवून घेण्याचे दोन फायदे आहेत. ती खूप स्टाइलिश दिसते आणि दुसरे म्हणजे आपण आपल्या उंचीनुसार अडजस्ट करता येते. (source snapdeal)
6 / 12
तुमच्या आवडत्या कुर्तीसाठी तुम्हाला मॅचिंग पँट किंवा सलवार सापडत नसेल, तर कुर्तीच्या रंगाचे मोती निवडा आणि पांढऱ्या रंगाच्या पँटला लावा.
7 / 12
बाजारात तुम्ही ही पॅण्ट घ्यायला जाल तर २०० रूपयांपासून ५०० रूपयांपर्यंत वेगवेगळ्या रंगाच्या आणि क्वालिटीतील पॅण्ट्स उपलब्ध होतील. ब्रॅण्डेड घेत असाल तर १ ते २ हजारापर्यंतही या पॅण्ट्सची किंमत आहे.
8 / 12
सिगारेट पॅण्ट्स ऑनलाईन खरेदी करत असताना त्याचं कापड कोणतं आहे, तसंच तुमच्या कमरेची मोजमाप करून मगच ऑर्डर करा. (Image Credit- myntra)
9 / 12
ऑनलाईन पॅण्ट मागवल्यानंतर अनेकदा साईज इश्यू किंवा कापडात बदल जाणवू शकतो. अशावेळी अनावश्यक त्रास टाळण्यासाठी रिटर्न पॉलिसी माहित करून घ्या मगच ऑर्डर करा.
10 / 12
काळ्या किंवा स्किनी रंगाची सिगारेट पॅण्ट तुम्हाला कोणत्या रंगाच्या कुर्त्यावर वापरता येईल.
11 / 12
12 / 12
टॅग्स : खरेदीफॅशनस्टायलिंग टिप्स