Short Mangalsutra Designs : २ वाट्यांचं मंगळसुत्र सौभाग्याची खूण; पाहा लहान मंगळसूत्राच्या १० खास डिझाइन्स
Updated:January 20, 2025 18:02 IST2025-01-19T16:51:33+5:302025-01-20T18:02:00+5:30
Daily Use Mangalsutra Designs : यात तुम्ही आवडीनुसार काळेमणी किती हवे, कसे हवेत ते ठरवू शकता.

मंगळसुत्र (Mangalsutra) हा सौभाग्याचा अलंकार असून २ वाट्यांच्या मंगळसुत्राला नेहमीच मागणी असते. लग्न समारंभ असो किंवा रोज वापरण्यासाठी मंगळसुत्र खरेदी करायचं असो. वाट्यांचे मंगळसुत्र नेहमीच घातले जाते. (Daily Use Mangalsutra Designs)
छोट्या वाटीच्या मंगळसुत्राचे वेगवेगळे पॅटर्न्स पाहूया. (Daily Use Short Mangalsutra Designs) लांब मंगळसुत्रापेक्षा शॉर्ट मंगळसुत्रात २ वाट्या जास्त शोभून दिसतात.
यात तुम्ही आवडीनुसार काळेमणी किती हवे, कसे हवेत ते ठरवू शकता.
जर तुम्हाला १ ग्रॅम सोन्यात असं मंगळसुत्र हवं असेल तर ते सुद्धा ज्वेलर्सच्या दुकानात किंवा ऑनलाईन् साईट्सवर उपलब्ध होईल.
साडीवर, ड्रेसवर किंवा वेस्टर्न वेअरवरही तुम्ही असं मंगळसुत्र मॅच करू शकता.
जर मंगळसुत्रात तुम्हाला बारीक चेन हवी असेल तर ४ ते ५ ग्रॅमपर्यंत सहज मिळेल.
अशी मंगळसुत्र लाईटवेट असल्यामुळे घातल्यानंतर फार जड वाटत नाही.
काहीजणांना काळेमणी कमीत कमी हवे असतात अशावेळी या डिजाईन्स उत्तम ठरतात.
आर्टीफिशियल ज्वेलरीमध्ये तुम्हाला असं मंगळसुत्र सहज मिळेल.
(Image Credit- Social Media)