Join us   

कपाटात कपड्यांचा सतत पसारा होतो, ऐनवेळी काहीच सापडत नाही? पाहा ७ भन्नाट स्वस्तात मस्त ऑर्गनायझर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2023 4:20 PM

1 / 8
कपड्यांचं कपाट कितीही आवरलं तरी त्यात पसारा होतो आणि ऐनवेळी बाहेर जाताना आपल्याला हवे ते कपडे कधीच सापडत नाहीत. अशावेळी कपाटात ऑर्गनायजर वापरणं केव्हाही जास्त चांगलं (Different Pattern of Cloth Organizers).
2 / 8
बाजारात विविध प्रकारचे ऑर्गनायजर मिळत असून त्यामुळे कपडे नीटनेटके राहण्यास निश्चितच मदत होते.
3 / 8
साड्या, हेवी ड्रेस किंवा कधीतरीच लागणारे कपडे ठेवण्यासाठी अशाप्रकारचे कापडी ऑर्गनायजर्स तर आपलं कपडे नीट ठेवण्याचं काम खूप सोपं करतात.
4 / 8
कपाट मोठं असेल आणि त्यात मोठमोठे कप्पे असतील आणि कपडे विभागून ठेवायचे असतील तर अशाप्रकारच्या बास्केट फारच उपयुक्त ठरु शकतात. त्या ठेवायला आणि वापरायला अतिशय सोयीच्या असतात.
5 / 8
हँगरप्रमाणे असणारे पण त्यातही कप्पे असतील असे डीझायनर ऑर्गनायजरही वापरायला सोपे आणि कपडे सापडायलाही सोयीचे असतात.
6 / 8
इस्त्रीचे शर्ट, कुर्ते, पंजाबी ड्रेस किंवा कोणत्याही प्रकारचे कपडे विस्कटू नयेत यासाठी कपड्यांच्या घडीच्या मापाचे असे कापडी ऑर्गनायजर स्वस्तात मस्त मिळू शकतात.
7 / 8
ड्रॉवरमध्ये ठेवता येतील असे लहान आकाराचे आणि जास्त कप्पे असलेले ऑर्गनायजर लहान मुलांचे कपडे, सॉक्स, नॅपकीन, इनर वेअर्स अशा गोष्टी ठेवण्यासाठी सोपा पर्याय ठरतात.
8 / 8
जीन्स किंवा फॉर्मल पँट एकाच प्रकारचे कपडे नीट राहावेत आणि दिसावेत यासाठी अशाप्रकारचे कप्पे असलेले ऑर्गनायजर आपण वापरु शकतो.
टॅग्स : खरेदीस्वच्छता टिप्स