दीप अमावस्या स्पेशल : पाहा पारंपरिक दिव्यांचे एक से एक सुंदर प्रकार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 2:54 PM 1 / 8पूर्वी वीज नव्हती तेव्हा दिव्यांशिवाय पर्यायच नसायचे. त्यावेळी घरोघरी कंदिल, लामण दिवे असे दिव्यांचे खूप सुंदर प्रकार असायचे. इतकेच नाही तर अनेक घरांमध्ये तिन्हीसांजेला लावल्या जाणाऱ्या समईच्या प्रकाशातच कित्येक गोष्टी व्हायच्या (Dive Traditional Patterns Dip Amavasya Special). 2 / 8हा दिव्यांमधील अतिशय जुना प्रकार असून आता आपण दिवाळीमध्ये लावतो ती मातीची पणती नियमितपणे वापरली जायची. 3 / 8हाही अतिशय पारंपरिक आणि राजेरजवाड्यांमध्ये ठेवला जाणारा प्रकार. आजही देवघरातील लहा समयांपासून ते मोठमोठ्या कित्येक फुटी नक्षीदार समया पाहायला मिळतात. 4 / 8हा देवघरातला अतिशय शांत आणि कित्येक काळ तेवत राहणारा पण भरपूर प्रकाश देणारा दिवा. निरांजन लावल्यावर घरात अतिशय प्रसन्न वाटते.5 / 8देवाजवळ कित्येक तास तेवत राहणारा दिवा म्हणजे अखंड दिवा. आतल्या बाजुने वात घालायची असल्याने आणि या दिव्याचे तोंडही मोठे असल्याने यात बरेच तेल मावते आणि ते कित्येक तास तेवत राहते. 6 / 8मशाल हा दिव्यांतील एक महत्त्वाचा प्रकार. शिवकाळात या मशालीला विशेष महत्त्व होते. मशाल पेटवण्याची पद्धत आणि तिचा प्रकाश यांचे एक वेगळेच गणित असायचे. आता मात्र मशाल फारशी वापरली जात नाही. 7 / 8पारंपरिक पद्धतीचा काचेच्या आत लावला जाणारा दिवा म्हणजे लामण दिवा. हा दिवा अनेकदा लटकता असायचा. तो घराच्या मध्यभागी खुंटीला लटकवून लावला जायचा. जेणेकरुन त्याचा घरभर प्रकाश पडायचा. 8 / 8नेहमीच्या निरांजनीप्रमाणेच पण वाटीसारखा आकार असलेल्या या निरांजनीत कापूर, फुलवात लावण्याची रीत आहे. आजही अनेक घरांमध्ये ही निरांजन आवर्जून वापरली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications