कोणत्याही ड्रेसवर- साडीवर शोभून दिसतील असे मोत्याचे कानातले! बघताक्षणीच आवडणारे ८ सुंदर डिझाईन्स
Updated:October 30, 2024 18:21 IST2024-10-30T15:25:26+5:302024-10-30T18:21:15+5:30

दिवाळीमध्ये जर मोत्याच्या कानातल्यांची खरेदी करायची असेल तर हे काही लेटेस्ट फॅशनचे डिझाईन्स पाहा. अगदी नजर खिळवून ठेवणारे सुंदर प्रकार आहेत...
हल्ली अशा पद्धतीच्या कानातल्यांची खूप फॅशन आहे. इतर कोणत्याही डिझाईनपेक्षा हा नवा प्रकार अनेकजणींना आवडतो आहे.
थोडे मोठे कानातले बघत असाल तर हा एक प्रकार तुम्हाला आवडू शकतो.
मोत्याचे कानातले आणि त्याला जोडूनच असणारा मोत्याचा वेल हा प्रकारही सध्या खूप ट्रेण्डिंग आहे.
ऑक्सिडाईज कानातल्यांना मोत्यांचे लटकन हे कॉम्बिनेशन नेहमीच खूप सुंदर दिसतं. साडी, ड्रेस, घागरा, पटियाला असे कोणत्याही पेहरावावर ते कानातले शोभून दिसतात.
मोत्याच्या कुड्या आवडत असतील तर त्यात आलेले हे नवनविन प्रकार पाहा.. कोणत्याही वयोगटाच्या महिलांना ते छानच दिसतं.
मोत्याच्या कुड्या प्रकारातलाच हा थोडा आणखी मोठा आणि भरीव प्रकार. कोणत्याही काठपदर साडीवर तुम्ही हे कानातले घालू शकता. खूप सुंदर लूक येईल.
मोराच्या पिसारा असल्यासारखे हे टपोरे मोती पाहा. अगदी बघताक्षणीच नजर खिळवून ठेवणारे हे कानातले कोणालाही लगेच आवडतील असेच आहेत.
मोठे लोंबते कानातले आवडत असतील तर हा प्रकारही तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता. असं एखादं कानातलं आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं..