1 / 9दिवाळीमध्ये जर मोत्याच्या कानातल्यांची खरेदी करायची असेल तर हे काही लेटेस्ट फॅशनचे डिझाईन्स पाहा. अगदी नजर खिळवून ठेवणारे सुंदर प्रकार आहेत...2 / 9हल्ली अशा पद्धतीच्या कानातल्यांची खूप फॅशन आहे. इतर कोणत्याही डिझाईनपेक्षा हा नवा प्रकार अनेकजणींना आवडतो आहे.3 / 9थोडे मोठे कानातले बघत असाल तर हा एक प्रकार तुम्हाला आवडू शकतो.4 / 9मोत्याचे कानातले आणि त्याला जोडूनच असणारा मोत्याचा वेल हा प्रकारही सध्या खूप ट्रेण्डिंग आहे. 5 / 9ऑक्सिडाईज कानातल्यांना मोत्यांचे लटकन हे कॉम्बिनेशन नेहमीच खूप सुंदर दिसतं. साडी, ड्रेस, घागरा, पटियाला असे कोणत्याही पेहरावावर ते कानातले शोभून दिसतात.6 / 9मोत्याच्या कुड्या आवडत असतील तर त्यात आलेले हे नवनविन प्रकार पाहा.. कोणत्याही वयोगटाच्या महिलांना ते छानच दिसतं.7 / 9मोत्याच्या कुड्या प्रकारातलाच हा थोडा आणखी मोठा आणि भरीव प्रकार. कोणत्याही काठपदर साडीवर तुम्ही हे कानातले घालू शकता. खूप सुंदर लूक येईल.8 / 9मोराच्या पिसारा असल्यासारखे हे टपोरे मोती पाहा. अगदी बघताक्षणीच नजर खिळवून ठेवणारे हे कानातले कोणालाही लगेच आवडतील असेच आहेत. 9 / 9मोठे लोंबते कानातले आवडत असतील तर हा प्रकारही तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता. असं एखादं कानातलं आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं..