Join us   

Jhumka Designs Ideas : दिवाळीसाठी गोल्ड झुमक्यांच्या 20 पेक्षा जास्त नव्या डिझाईन्स; पाहूनच प्रेमात पडाल इतके सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 11:47 AM

1 / 13
दिवाळी (Diwali 2023) म्हटलं की दागिन्यांची खरेदी आलीच. यंदा कानातल्यांच्या नवीन डिजाईन्स दिवाळीला खरेदी करू शकता. सण-उत्सवांच्या वेळेस साडीवर झुमके घातले जातात. झुमके घातल्याने चेहरा अधिकच उठून दिसतो. (Golden Zumka Patterns)
2 / 13
या झुमक्यांच्या डिजाईन्स तुम्हाला गोल्ड प्लेटेड, वन ग्रॅम गोल्ड किंवा आर्टिफिशियल उपलब्ध होतील. तुम्ही आवडीनुसार या डिजाईन्स बनवूनही घेऊ शकता. (Gold jhumka design new model)
3 / 13
या सुंदर डिजाईन्सचे झुमके तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेऊ शकता. पण ज्वलेरीच्या शॉपमध्ये जाऊन खरेदी केलेलं कधीही उत्तम. यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.
4 / 13
जर तुम्ही रोज वापरण्यासाठी झुमके घेत असाल तर थोडे नाजूक डिजाईन्सचे पाहा किंवा कधीतरी वापरण्यासाठी पाहत असाल तर जड डिजाईन्सची निवड करू शकता.
5 / 13
कानातल्या झुमक्यांचे एकूण ८ प्रकार असतात यात क्लस्टर, ड्रॉप, हूप, हेलो यांचा समावेश आहेत.
6 / 13
ज्यांच्या कानांची त्वचा खूपच नाजूक असते त्यांनी जास्त जड झुमके घालू नये. यामुळे कानाचे छिद्र फाटू शकते.
7 / 13
जवळपास ६ ते ८ ग्राममध्ये तुम्ही सुंदर, फॅशनेबल झुमके घेऊ शकता.
8 / 13
झुमक्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स उपलब्ध होतील. लांबट- पट्टी वाले, जाळीवाळे यापैकी तुम्ही तुम्हाला आवडते निवडू शकता.
9 / 13
कानांना त्रास होऊ नये यासाठी आधी मॉईश्चराईजर लावून मग कानात झुमके घाला. जेणेकरून कानांची त्वचा लाल होणार नाही.
10 / 13
फुलांच्या डिजाईन्सचे झुमकेसुद्धा आकर्षक दिसतात. खाली मोती असतील तर त्याची अधिकच शोभा वाढेल.
11 / 13
काढापदराच्या साड्यांवर असे झुमके तुमचा लूक अधिकच खुलवतील.
12 / 13
डबल लेअर्सचे कानातले घातल्याने चेहरा खुलून येतो. यामुळे तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरजच लागणार नाही.
13 / 13
(Image Credit- Social Media)
टॅग्स : खरेदीदिवाळी 2023फॅशनदागिने