Diwali : दिवाळीसाठी नवीन सोफा कव्हर खरेदी करताय? पाहा १० नवेकोरे सोफा कव्हर पॅटर्न-बदला घराचा लूक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 9:46 AM 1 / 10दिवाळीला फक्त घरच्यांसाठीच नाही तर घरातल्या वस्तूंसाठीदेखील आपण नवे कपडे खरेदी करतो. यातली एक महत्वाची वस्तू म्हणजे सोफा. बर्याचदा सोफा खराब झालाय म्हणून किवा खराब होऊ नये म्हणून आपण त्यावर कव्हर घालतो. पण जर तुम्हाला त्याच त्या टिपिकल सोफा कव्हरचा कंटाळा आला असेल तर बाजारात काही नवीन प्रकार आले आहेत (Diwali shopping latest sofa cover pattern change the look of your home).2 / 10हे कव्हर तुमचा संपूर्ण सोफा झकतात. त्यामुळे सोफ्याचं कापड किंवा पाय खराब झाले असेल तर अशा कव्हरने ते झाकले जाऊन आकर्षक कव्हरने घराची शोभा वाढेल.3 / 10सध्या बाजारात अशा मॅट कव्हरना देखील मोठी मागणी आहे. बसल्यावर कव्हरच कापड सरकल्याने ते वाईट दिसतं. पण हे कव्हर तसे सरकत नाही. जर तुमच्याकडे लहान मुले किंवा पाळीव प्राणी असतील तर या प्रकारच कव्हर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.4 / 10सोफा कव्हरचा हा पर्याय तसा अगदीच नवा नसला तरी आजही ट्रेंडिंग आहे. आपण मोठ्या हैशेने इतर फर्निचरशी मॅचिंग सोफा घेतलेला असतो. त्याचा रंग ही दिसावा आणि कव्हरही घातले जावे अशी दुहेरी सोय यात होते. शिवाय हे फार उठावदारी दिसते.5 / 10हल्ली अशाप्रकारच्या सोफा कव्हरची चलती दिसते. हा प्रकार बाजारात रेडिमेडपण मिळतो आणि तुम्हाला बनवताही येतो. जुन्या सतरंजी किंवा चादरीला अशाप्रकारे गोंडे लावून हे आकर्षक सोफा कव्हर बनवता येते. त्यावर उशांना गोंडे लावलेलेच कव्हर घालावे.6 / 10जर तुम्हाला पैसे खर्चून सोफा कव्हर आणायचे नसेल आणि तरीही सोफ्याला कव्हर घालायचे असेल तर हा एक स्टायलिश प्रकार सध्या ट्रेंडिंग आहे. घरातील एखादी जाडसर बेडशीट घेऊन ती सोफ्यावर कव्हरसारखी व्यवस्थित पसरवून घालावी.7 / 10हा देखील एक आकर्षक पर्याय म्हणता येईल. जसे साडी किंवा ओढणीचे कुशन कव्हर बनवतात तसाच त्याचा सोफा कव्हर म्हणून सुद्धा वापर होऊ शकतो. जरीकाठाची, प्रिंटेड, कॉटनची साडी तुम्ही यासाठी वापरुन घराची शोभा वाढवू शकतात.8 / 10सध्या हा एक अत्यंत स्टायलिश प्रकार बाजारात आला आहे. यात सोफ्याला पहिले प्लेन कव्हर घातले जाते. त्यावर एका बाजूला विरुद्ध रंगाचे प्रिंटेड कापड आंथरले जाते. तर त्या प्रिंटेड कापडला मॅचिंग उशी दुसर्या बाजूला सजवली जाते.9 / 10हे कव्हर जाड असते. याच्या किनारी भागाला अधिक कडकपणा दिलेला असतो जेणेकरून ते सोफ्याला चिकटून राहावे व सुव्यवस्थित दिसावे. घराला रॉयल लुक देणारा हा कव्हरचा प्रकार म्हणता येईल.10 / 10स्ट्रेचेबल कपडापासून बनवलेले हे कव्हर असते. एखादा टीशर्ट घालावा त्याप्रमाणे हे कव्हर सोफ्याला घातले जाते. जे काढणे घालणे तुलनेने कठीण असले तरी स्वच्छतेच्या दृष्टीने सोयिस्कर असते. यात सोफा पूर्ण कव्हर होतो व आकर्षक दिसतो. आणखी वाचा Subscribe to Notifications