दिवाळी स्पेशल : फॅशनेबल स्लिव्हजचे १० युनिक डिझाइन्स! पाहा एक से एक पॅटर्न-शिवा फॅशनेबल ब्लाऊज
Updated:October 14, 2024 19:07 IST2024-10-14T17:38:11+5:302024-10-14T19:07:44+5:30
Diwali Special Latest Blouse Designs : नेटची साडी असो किंवा काठापदराची तुम्ही अशा युनिक पॅटर्नचे स्लिव्हज डिजाईन्स शिवू शकता

दिवाळीच्या सणाला सर्वचजण नवीन कपड्यांची खरेदी करतात. बऱ्याच स्त्रिया साड्या विकत घेतात. नवीन साड्यांवर शोभतील असे सुंदर ब्लाऊज पॅटर्न्स तुम्ही ट्राय करू शकता. सतत टिपिकल पॅटर्नचे ब्लाऊज शिवल्यास हवा तसा युनिक लूक मिळत नाही. (Latest Blouse Designs Unique Patterns)
नेटची साडी असो किंवा काठापदराची तुम्ही अशा युनिक पॅटर्नचे स्लिव्हज डिजाईन्स शिवू शकता. फ्रिलचे हात किंवा बलून स्टाईलचे हात उठून दिसतात.
व्ही नेक आणि लॉन्ग स्लिव्हज फ्रिलचे हात तुम्ही शिवू शकता.
जर तुम्ही स्लिव्हजलेस ब्लाऊज घालणं पसंत करत असाल तर या पॅटर्नचं ब्लाऊज तुमच्यावर फार उठून दिसेल.
फ्रिलच्या हातांवर खाली लांब हातांचे पॅटर्नही शोभून दिसेल.
फुग्यांच्या हातांना तुम्ही खड्यांच्या पॅटर्नची लेस लावू शकता ज्यामुळे बाह्या अधिकच शोभून दिसतील.
नेटच्या कापडावर हे नवीन ब्लाऊज डिजाईन्स तुम्ही ट्राय करू शकता.
बोट नेक पॅटर्नवर लांब हात चांगलेच शोभून दिसतात.
तुम्ही लग्नसमारंभासाठी असं ब्लाऊज शिवू शकता किंवा साडी प्लेन असेल तर ब्लाऊजवर असं वर्क शिवून घ्या.
व्हि नेक आणि नेकचे फुग्यांचे हात शोभून दिसतात.